सिद्धीला कॅन्सरला हरवायचंय; मोलमजुरी करणाऱ्या आई वडिलासमोर खर्चाचा प्रश्न

siddhi swallow cancer in kolhapur economic problems family operation
siddhi swallow cancer in kolhapur economic problems family operation
Updated on

कोल्हापूर : कायम हसरा चेहरा. स्वभावाने मनमिळाऊ. अभ्यासात तर तिचा कायम पहिला नंबर. प्रज्ञाशोध परीक्षेत पैकीच्या पैकी गुण. आडूर (ता. करवीर) येथील चौथीत शिकणारी सिद्धी कांबळे. अभ्यास करून खूप मोठ व्हायचं असं तिचं स्वप्न; पण नियतीच्या मनात वेगळेच. अचानक ब्लड कॅन्सरचे निदान झाले आणि पालकांवर आभाळ कोसळले. मोलमजुरी करणाऱ्या वडिलांना तिच्या उपचाराचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न सतावत आहे.

आठवड्याभरापूर्वी सिद्धीला ताप आला. ताप वाढतच गेल्याने खासगी रुग्णालयात दाखल केलं. रक्त तपासणी केली अन्‌ धक्कादायक अहवाल आला. तिला ब्लड कॅन्सर असल्याचे डॉक्‍टरनी वडील मोहन कांबळे यांना सांगितले. मोहन यांना खात्री होत नव्हती म्हणून सीपीआर गाठलं. तिथेही तोच अहवाल. आई-वडिलांचा अश्रुंचा बांध तिथेच फुटला. खासगी रुग्णालयात उपचारासाठी तिला दाखल केले आहे.

उपचारासाठी जवळपास १० ते १२ लाख रुपये खर्च आहे. वडील मोलमजुरी तर कधी रंगकाम करतात. आईही मजुरी करते. इतकी रक्कम कशी आणायची, असा त्यांच्या समोर प्रश्न आहे.
६ महिने विविध उपचार होणार आहेत. योग्य उपचार झाल्यास ती ९० टक्के बरी होऊ शकते, असे डॉक्‍टरांकडून सांगण्यात आले. मदतीसाठी वडील उंबरठे झिजवत आहेत. 

दातृत्वाला आवाहन

सिद्धी शिकत असलेल्या विद्यामंदिरच्या शिक्षण समितीने मदतीचा काही वाटा घेण्याचे ठरवले आहे. दवाखान्यात असूनही पुस्तकांची मागणी व परीक्षा देण्याचा हट्ट करणाऱ्या सिद्धीला मदतीची गरज आहे. या कोवळ्या जिवाला कॅन्सरमुक्त करण्यासाठी मदतीचा हात देण्याचे आवाहन सिद्धीचे वडील व शिक्षकांनी केले आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.