'ते' मुंबईतील रेड झोन मधून गावात आले, सोबत आणलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले अन् झाले गायब...

six people Coming from the red zone in Mumbai and cremated the person at rukadi kolhapur
six people Coming from the red zone in Mumbai and cremated the person at rukadi kolhapur
Updated on

रुकडी (कोल्हापूर) - मुंबईतील रेड झोन मधून येऊन त्या सहा लोकांनी तेथून त्यांच्या सोबत आणलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर हे सर्वजण गूढ रीत्या गायब झाल्यामुळे रूकडी वासियांच्यात भीती निर्माण झाली आहे.

सध्या मुंबईत स्थायिक व मूळचे रुकडीचे असलेले एक कुटूंब चार दिवसा पूर्वी  एका आजारी रुग्णासह  सकाळी ९  च्या सुमारास गावात दाखल झाले.वास्तविक मुंबईतील रेड झोन  सारख्या ठिकाणाहून ते आले असून त्यांच्याकडे कोणताही पोलिस किंवा वाहतूक परवाना नव्हता. गावातील कोरोना समितीचे अध्यक्ष रफीक कलावंत व कांही सदस्यांनी त्या संपूर्ण कुटुंबाला प्राथमिक आरोग्य पथकात तपासणीसाठी आणले.त्यावेळी चौकशी केली असता  गाडीतील त्या वृद्ध इसमाची मुंबईत कोरोना चाचणी झाली असून तो निगेटीव्ह असून कांही वेळेनंतर त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ

यावेळी गावात याची चर्चा होवून वातावरण बिघडेल या हेतूने कोरोना समितीचे अध्यक्ष व कांही सदस्य व नातेवाईक यांनी मृतदेहास दहन केले.  वास्तविक  वैद्यकिय अधिकाऱ्यांकडून  मृत व्यक्तीचे  कोरोना तपासणीसाठी स्वॅब किंवा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय इस्पीतळात पाठवणे गरजेचे होते पण तसे झाले नाही.पण  अशा वेळी  फक्त कांही शासकीय अधिकाऱ्याशी फोनवरून चर्चा करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेवून एकप्रकारे ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ केला आहे अशी भावना आता ग्रामस्थांच्या मध्ये निर्माण झाली आहे.मुंबईहून आलेल्या  इनोव्हा गाडीतून  सहा व्यक्ती ह्या  आपल्यासोबत रुग्णास कि मृतदेहास घेवून आले असावेत  याबाबत संशय कायम आहे.त्याचबरोबर किणी तपासणी  टोलनाका व रुकडी चेकपोस्ट नाका  येथील  वाहन प्रवेशाच्या नोंदी संशयास्पद असल्याचीही चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.

मृतदेहाचे  दहन केल्यानंतर, सोबत आलेल्यां सहा व्यक्तीचे  कोल्हापूर सी.पी.आर येथे  तातडीने स्वॅब घेवून क्वारेंटाईन करणे गरजेचे होते. यासाठी सरपंच कलावंत व उपसरपंच राजू कोळी यांनी कोल्हापूर येथील सी.पी.आर. येथे सोडून आले. नंतर या सहा लोकांनी पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या एकूणच प्रकाराबाबत आता उलटसुलट चर्चा आणि भितीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे.

कोणीच गांभीर्याने घेतले नाही

वास्तविक मुंबईतून आलेल्या या गाडीतील व्यक्ती मृत झाल्यामुळे त्याबाबत आरोग्य केंद्रात कार्यवाही होणे गरजेचे होते. तसेच पोलिसांनीही या प्रकरणी गांभीर्याने तपास करणे गरजेचे होते. ग्राम समिती सदस्यांनी दक्षतेने याबाबत चौकशी करणे आवश्यक होते मात्र कोणत्याच पातळीवर या गोष्टीकडे गांभीर्याने घेतले बघितले नसल्याचे पुढे आले आहे.
 

या प्रकरणात  गावातील जबाबदार व्यक्ती बेजबाबदारपणे वागले आहेत .स्थानिक कोरोना समितीचे अध्यक्ष व या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हा नोंद करणार आहे.
- संजय कांबळे व के.डी. कांबळे ( रुकडी ग्रामस्थ )

रुकडी गावात आलेले ते सर्वजण पलायन केल्याचे केल्याची माहिती पुढे आली आहे.गावची फसवणूक करणाऱ्या त्या सर्व नातेवाईकांवर समितीच्या वतीने फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे.
 रफीक कलावंत,अध्यक्ष - कोरोना दक्षता समिती,रुकडी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.