कागल (कोल्हापूर) : मराठा समाजाच्या (maratha reservation)प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शासनदरबारी पाठपुरावा करू, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Rural Development Minister Hasan Mushrif)यांनी दिली. कागलमध्ये शासकीय विश्रामगृहात मंत्री मुश्रीफ यांची व तहसीलदार यांची तहसील कार्यालयात सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी भेट(Skal Maratha Samaj met)घेऊन चर्चा केली. (skal-maratha-samaj-met-in-rural-development-minister-hasan-mushrif-kolhapur-news)
मराठा समाजाला घटनात्मकरीत्या टिकणारे आरक्षण द्या, त्यासाठी सरकारने केंद्र सरकारकडे मागणी करावी. सारथीवर कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करून संस्थेची जिल्हानिहाय विस्तारवाढ व दरवर्षी दोन हजार कोटी निधी द्यावा. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची कर्जमर्यादा वैयक्तिक २५ लाख व सामूहिक ५० लाख करा. दरवर्षी पाच हजार कोटींची तरतूद व व्याज परतावा नियमित मिळावा. मराठा आरक्षणातून नियुक्त झालेल्या २,७६० उमेदवारांना तातडीने नियुक्त्या द्याव्यात.नोकरी व शिक्षणात मराठ्यांना ओबीसींप्रमाणेच सुविधा आदी मागण्या केल्या.
प्रताप उर्फ भय्या माने, नितीन दिंडे, विशाल पाटील, प्रकाश जाधव, नितीन काळबर, नानासो बरकाळे, विक्रम चव्हाण, सचिन मोकाशी, महेश मगर, दीपक मगर, शशिकांत भालबर, अमित पाटील, संग्राम लाड, अविनाश जाधव, सचिन निंबाळकर, जितेंद्र सावंत, अजित साळुंखे, अखिलेश भालबर, महेश शेडबाळे आदी उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.