'पित्त जाळत अंगात रगात येतं'; विकून नेर्ली आणि काजू, सावरली संसाराची बाजू

special story of archana banage on amba area sales women of forest fruit in kolhapur
special story of archana banage on amba area sales women of forest fruit in kolhapur
Updated on

कोल्हापूर : अंगावर हिरवी साडी, कपाळाला लाल कुंकू ,थोडेसे केस विस्कटलेले, हातात नेर्ली आणि काजूची ॲल्युमिनियम प्लेट घेऊन विकत उभारलेली शांताबाई, तेजूबाई आणि तानुबाई तर वयाची सत्तरी पार केलेली पारू आजी .  गाडी थांबताच दरवाजा उघडताच या सर्वांची गाडीकडे धाव. 'पित्त जाळत अंगात रगात येतं'. घ्या साहेब नेरली घ्या वीस रुपये प्लेट.असा त्यांचा आग्रह सुरू राहतो .

रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाट या ठिकाणाच हे चित्र. उन्हाची भ्रांत नाही, पोटाची आग नाही, डोक्यात फक्त विक्री करणे आणि चार पैसे मिळवणे एवढ्यासाठीच त्यांचा हा आटापिटा. यासाठी त्यांची सकाळी दहा  वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत धडपड सुरू असते.

का आहे हे ठिकाण महत्त्वाचे

आंबा म्हणजे रत्नागिरी कोल्हापूरला जोडणारा  महामार्गावरील प्रमुख ठिकाण. महाराष्ट्रसह कर्नाटकातील अनेक पर्यटक विशाळगडकडे जातांना याठिकाणी थांबतात. मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे बरेच पर्यटक जेवणासाठी किंवा नाश्तासाठी या ठिकाणी थांबतात. त्यामुळे येथे जास्त विक्री होऊ शकते, या आशेने  परिसरातल्या महिला जंगलातील उन्हाळी फळे विकण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभ्या असतात. 

त्या महिलांचा असा असतो दिनक्रम

त्यांचा दिवस सुरू होतो पहाटे चार पासून. पहाटे चारला उठायचं घरातले सगळे काम आवरायचे आणि जंगलात जाऊन  नेर्ली काढायचं. यासाठी एक डबा  गळ्यात बांधून  झाडावर चढायचे आणि एक एक नेर्ली डब्यात टाकायची. शेजारीच असलेल्या काजू बाग मालकाकडून काजू विकत घ्यायचे आणि काजू, नेर्ली घेऊन आंबा बसस्टॉपवर यायचे हा त्यांचा रोजचा दिनक्रम. दिवसभरात कधी 100 विक्री होईल कधी 200 होईल. दिवस ठरलेलाच. काट्याकुट्यातून जाऊन नेर्ली  गोळा करत असताना झालेल्या जखमांचा विचार न करता आजच्या दिवसात आपली विक्री कशी चांगली होईल याकडे लक्ष.ना चेहऱ्याला पावडर, ना केसाला तेल. आहे त्या अवस्थेत कपड्यात भाकरी  गुंडाळून रस्त्याच्या कडेला उभारायचं आणि विकत राहायचं त्यांचा दिनक्रम.

अशी काढतात नेरली

ना कोणते शिक्षण ना कोणत प्रशिक्षण. नेर्ली तयार झाल्याची चाहूल लागली की जंगलात सखी सहेली बरोबर जायचं. फेरफटका मारायचा आणि फळ तयार झाले की नाही हे बघायचं. झाल असेल तर ठीक नसेल तर परत दुसऱ्या दिवशी गाठायचं. तयार झालेले फळे गोळा करायचं आणि ते विकत उभारायचं. सकाळी दहाला उभारलेल्या या माऊली रात्री आठपर्यंत मात्र उभ्याच  राहतात.

पारू आजीची सत्तरीत धडपड 

कष्टाने आणि सन्मानाने जगायचं हाच पारू आजीचा ध्यास . म्हणूनच उन्हातान्हाची पर्वा न करता वयाची सत्तरी पार केल्यानंतरही रानमेवा विक्रीसाठी पारू आजी रस्त्याकडेला उभी असते. दिवसागणिक काहीतरी मिळवायचं आणि स्वाभिमानाने पोट भरायची हीच आजीची धडपड. नक्कीच प्रेरणादायी आहे.

जंगली फळ नेरली

मार्च महिना सुरू झाला की अवघ्या पंधरा दिवसाचे नेरली चे  आयुष्य असते. हे फळ आरोग्य साठी  खूप उपयुक्त आहे .हे फळ रक्त वाढीसाठी मदत करत. त्याचबरोबर पित्त नाशक ही आहे.जंगलात मिळणारे हे फळ अनेकांना आर्थिक बळ तर देतेच त्याचबरोबर अनेकांना या फळांचा चांगला उपयोग होतो.

जगण्याच्या लढाईत बळ 

जंगलातील अनेक फळे ही त्या परिसरातील महिलांना एक जगण्याच्या लढाईत आर्थिक बळ देणारी ठरतात. ही फळे अनेकांना विविध व्याधीवर उपयुक्त ठरतात. अशा अनेक गरजू  महिला जंगलात जाऊन आणि प्रसंगी धोका पत्करून ही फळे उपलब्ध करून देत असतात. त्यांच्या जगण्याच्या लढाईत या जंगली मेव्याची विक्री करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.