कोल्हापूर : वयाच्या तिसऱ्या वर्षात पदार्पण केलेली स्वरा सध्या 1 मिनिटात 38 वेळा नाकाला जीभ लावते. नाकाला जीभ लावण्याचा वडिलांचा असलेला विक्रम पुढे चालू ठेवण्यासाठी स्वरा आणि आणि तिची बहीण शोर्या प्रयत्नशील आहेत. यामध्ये विश्वविक्रम करण्याचा मानस या कुटुंबातील तिघांनी घेतला आहे. शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी या गावातील शेतकरी कुटुंबातील नामदेव निर्मळे हे साखर कारखान्यात काम करतात. सन 2013 मध्ये त्यांच्या वाचनात दिल्लीतील एका गृहस्थांची माहिती निदर्शनास आली होती. त्यावेळी त्या गृहस्थानीं एका मिनिटात शंभर वेळा नाकाला जीभ लावण्याचा विक्रम केला होता.
लहानपणापासूनच कोणतेही शिक्षण न घेतलेले नामदेव हे नाकाला जीभ लावतच होते. या गृहस्थांची माहिती वाचतात त्यांच्यात एक आत्मविश्वास निर्माण झाला आणि त्यांनी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी एका मिनिटात एकशे दहा वेळा नाकाला जीभ लावण्यास सुरुवात केली. थोडा आत्मविश्वास वाढल्याने त्यानी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. सुरवातीला त्यांना गावातील कोणीही मदत केली नाही. तब्बल सात वर्षाच्या अथक प्रयत्नाने त्यांनी विश्वविक्रम करण्याचा मानस केला यामध्ये त्यांना गुरुदत्त शुगर मिलचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आणि त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली.
2019 मध्ये ग्लोबल रेकॉर्ड अँड रिसर्च फाउंडेशन यामध्ये 1 मिनिटात 147 वेळा नाकाला जीभ लावण्याचा विश्वविक्रम नामदेव यांनी नोंदवला. ही स्पर्धा मध्ये 1 मिनिटात 142 वेळा नाकाला जीभ लावायची होती. मात्र निर्मळे यांनी तब्बल 147 वेळा नाकाला जीभ लावली आणि त्यांनी रेकॉर्ड मोडून काढले.
त्यांचा हाच प्रगल्भ वारसा त्यांच्या दोन्ही चिमुकल्यां चालवत आहेत. केवळ अडीच वर्षांची असलेली स्वरा आता एका मिनिटात 38 वेळा नाकाला जिभ लावू शकते. स्वरा ने वयाच्या दुसऱ्या वर्षांपासून सरावास सुरुवात केली. सुरवातीला ती 1 मिनिटांमध्ये 7 वेळा जीभ लावत होती. आता ती 38 वेळा जीभ लावते.तिची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे. आता ती आशिया बुक ऑफ रेकॉर्ड साठी प्रयत्न करत आहे. तर दुसरी मुलगी शौऱ्या ही पाच वर्षाची असून ती एका मिनिटात 65 वेळा नाकाला जीव लावते.
हेही वाचा - अमेरिकेत सजला मराठमोळा गणेशोत्सव...
एक आगळा आणि वेगळा विक्रम आपल्याच नावे रहावा यासाठी हे कुटुंब धडपडत आहे. अत्यंत लहान वयात करत असणारी या चिमुकल्यांची धडपड नक्कीच कौतुकास्पद आणि जिद्दी कुटुंबांचे एक आगळे वेगळे उदाहरण आहे. नाकाला जीभ लावण्याचा विश्वविक्रम करण्यासाठी निर्मळे कुटुंब परीश्रम घेत आहे. नियमीतपणे दररोज दोन तास सराव करतात. ज्यावेळी त्यांनी व्हिडीओ स्पर्धेसाठी द्यायचा असतो त्यावेळी ते सलग आठ दिवस गोड, तेलकड पदार्थ टाळतात.
"लहानपणापासून मला काहीतरी करण्याची आवड होती. आता माझ्या मुलींनाही ती आवड आहे.आम्ही सध्या आशिया बुक ऑफ रेकॉर्ड साठी प्रयत्न करणार आहोत. जगात भारी आम्ही कोल्हापूरी हे आम्ही दाखवून देणार आहोत."
- नामदेव निर्मळे
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.