एसटी वाहतूक 32 मार्गांवर सुरू; हे 4 मार्ग बंद

Karad ST
Karad STesakal
Updated on

कोल्हापूर: धुवाँधार पावसामुळे राज्य मार्ग, जिल्हा मार्ग व महामार्ग पुराच्या पाण्यात वेढले गेले. त्यामुळे गेले आठ दिवस बंद असलेली एसटीची सेवा चार मार्ग वगळता जिल्ह्यातील ३२ मार्गांवर सुरू झाली आहे. यात कोल्हापूर-पुणे मार्गावर सर्वाधिक प्रवाशांनी प्रवास केला, तर चार दिवसांपासून अडकून पडलेल्या प्रवाशांनाही आपापल्या गावी सुखरूप पोहोचता आले, अशी माहिती एसटीच्या वाहतूक विभागाने दिली. (ST-traffic-started-32-routes-Most-passengers-travel-on-Kolhapur-Pune-route-akb84)

बहुतेक तालुका मार्गांवर विविध गावांजवळ पुराचे पाणी आले. यामुळे जिल्ह्यात जवळपास ४० मार्गांवरील एसटी बसच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. यात गुरुवारी व शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे महामार्गही बंद झाला. परिणामी मुंबई- पुण्याकडे निघालेले तसेच सोलापूर, सांगलीकडे निघालेले प्रवासी अडकून पडले. बहुतेकांनी एक रात्र बस स्थानकावर कशीबशी काढली. पावसाचा जोर व पुराचे पाणी ओसरत नाही, याचा अंदाज घेत शनिवार ते रविवार बहुतेकांनी कोल्हापुरातील नातेवाइकांच्या घरी किंवा हॉटेलमध्ये मुक्काम केला. यात नोकरी व्यवसायाचा भाग म्हणून कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या अनेक व्यक्तींचा समावेश होता. बहुतेकजण एसटी प्रवास केव्हा सुरू होईल, या प्रतीक्षेत होते, तर एसटीचे अधिकारी आपत्ती व्यवस्थापनाकडून मिळणाऱ्या माहितीवर मार्ग खुला केव्हा होईल याचा अंदाज बांधत होते.

Karad ST
महापूर शिकवतोय; शिकणार कोण?

यावेळी रविवारी पावसाने उघडीप दिल्याने पुराचे पाणी ओसरले आणि पहिला मार्ग मुधाळतिट्टा फोंडाघाटमार्गे कोकणातील बस वाहतूक सुरू झाली. या पाठोपाठ कोल्हापूर-पुणे या महामार्गावर वाहतूक सुरू झाली. एसटीच्या १६ फेऱ्या पुण्याकडे रवाना झाल्या. याच वेळी सांगलीत पुराच्या पाण्याची पातळी वाढल्याने जयसिंगपूरपर्यंत प्रवासी वाहतूक होत आहे. याशिवाय कागल, हातकणंगले, गडहिंग्लज, आजरा, राधानगरी येथील मार्गावर बंद पडलेली प्रवासी वाहतूक सुरू झाली. यात कोल्हापूर-कागल, इचलकरंजी या मार्गावरील शटल सेवाही सुरू झाली. त्यामुळे कोल्हापुरात अडकलेला बहुतांश प्रवासीवर्ग दुपारी दोन वाजेपर्यंत आपापल्या गावच्या दिशेने रवाना झाला.

मोजक्या गाड्या फोंडामार्गे कोकणात

गगनबावडा, आंबोली भागात भूस्खलन झाल्याने कोकणात जाणाऱ्या प्रवासी वाहतुकीसाठी दोन्ही मार्ग बंद आहेत, तर काही मोजक्या गाड्या फोंडामार्गे कोकणात जात आहेत.

जयसिंगपूर ते चिक्कोडी मार्ग बंद

कुरुंदवाडमध्ये अद्याप पूर असल्याने जयसिंगपूर ते चिक्कोडी मार्ग बंद आहे. निपाणी मार्ग आज सायंकाळपर्यंत बंद होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.