पावनगड आता राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित; पन्हाळगडावर झालेल्या आक्रमणावेळी गडानं बजावलीये महत्त्वाची भूमिका

Pavangadh Panhalgad : गडाच्या इतिहासापासून अलीकडच्या काळात गडावर ४०६ दगडी तोफ गोळे सापडले आहेत.
Pavangadh Panhalgad
Pavangadh Panhalgadesakal
Updated on
Summary

छत्रपती शिवरायांनी बांधलेला किल्ला. याचे मूळ नाव मार्कंडेय. हिरोजी फर्जंद व अर्जोजी यादव यांनी गडाचे मजबूत व सुंदर बांधकाम केल्याबद्दल त्यांना प्रत्येकी पाच हजार होन बक्षीस देण्यात आले होते.

पन्हाळा : ऐतिहासिक पन्हाळगडाचा (Panhalgad) जोड किल्ला म्हणून प्रसिद्ध असलेल्या पावनगडाला शासनाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. याबाबतची अधिसूचना आज शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने काढली आहे. दरम्यान, सूचना व हरकतींसाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.