Raju Shetti Bhogavati Factory
Raju Shetti Bhogavati Factoryesakal

Raju Shetti : 'स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर वाहतूक अडवू नये'; 'भोगावती'चे राजू शेट्टींना साकडे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर वाहतुकीची वाहने अडवू नयेत.
Published on
Summary

कारखान्याची साखरविक्री ठप्प झाली आहे. बँकेच्या कर्जावरील व्याजाची परतफेडही होणार नाही.

राशिवडे बुद्रुक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर वाहतुकीची वाहने अडवू नयेत. साखर वेळेवर उचल न झाल्यास कारखान्यासमोरच्या (Sugar Factory) अडचणी वाढतील, अशा आशयाचे निवेदन भोगावती साखर कारखान्याने आक्रोश पदयात्रेदरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांना दिले.

Raju Shetti Bhogavati Factory
Maratha Reservation : वातावरण तापलं! चुलीत गेला पक्ष अन् चुलीत गेले नेते; साताऱ्यातील 'या' गावांत राजकीय पुढार्‍यांना गावबंदी

निवेदनातील आशय असा : ‘केंद्राने गेल्या महिन्यात दिलेला जादा कोटा व ऑक्टोबरमधील २५ हजार क्विंटलचा कोटा १० ऑक्टोबरपर्यंत विक्री करायचा होता. मुदतीत विक्री होऊनही वितरण ठप्प झाल्याने कोटा बुडीत झालेला आहे. ऑक्टोबरसाठी कारखान्यात आलेला बावीस हजार क्विंटलचा कोटा २५ ऑक्टोबरपूर्वी विक्री करणे गरजेचे आहे. अन्यथा हा कोटाही बुडीत होईल.

Raju Shetti Bhogavati Factory
मोठी बातमी! गृहमंत्र्यांच्या जवळच्या नेत्याचा सुपारी देऊन खून; लोकसभा निवडणूक लढवण्याच्या होते तयारीत

कारखान्याची साखरविक्री ठप्प झाली आहे. बँकेच्या कर्जावरील व्याजाची परतफेडही होणार नाही. याशिवाय सभासदांना साखर देणे अडचणीचे झाले आहे. कामगारांना पगारासाठी पैसे उपलब्ध होऊ शकत नाहीत. नियमाप्रमाणे झालेली साखरविक्री वितरणासाठी व शिल्लक साखर कोटा मुदतीत विक्री होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी संचालक, प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील, सचिव उदय मोरे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.