Vishalgad Encroachment: विशाळगडावर अज्ञातांकडून दगडफेक, स्थानिक जखमी; संभाजीराजे पोहोचण्याआधीच वातावरण तापलं

Vishalgad Stone pelting: विशाळगडावर अज्ञातांनी गदडफेक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यात काही स्थानिक जखमी झाल्याची माहिती आहे.
 Sambhaji Raje
Sambhaji Raje
Updated on

कोल्हापूर- अतिक्रमण हटवण्यासाठी माजी खासदार संभाजीराजे हे विशाळगडावर जात आहेत. त्याआधीच विशाळगडावर वातावरण तापलं आहे. विशाळगडावर अज्ञातांनी गदडफेक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यात काही स्थानिक जखमी झाल्याची माहिती आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अतिक्रमण हटवण्यासाठी संभाजीराजे सकाळीच विशाळगडाकडे रवाना झाले आहेत. त्याआधीच गदडफेक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दगडफेक कोणी केली याची माहिती नाही. स्थानिकांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. व्हिडिओमध्ये दगड जमिनीवर पडल्याचं स्पष्ट दिसत आहेत.

 Sambhaji Raje
14 जुलैला हिंदू समाजाला विशाळगडावर बोलावून संभाजीराजे दुफळी माजवत आहेत का? विश्‍व हिंदू परिषदेचा सवाल

विशाळगडावर अतिक्रमण होत आहे. ते खपवून घेतलं जाणार नाही. विशाळगड संकटात आहे, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले होते. अनेक संघटनांनी देखील विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी आंदोलन केले होते. संभाजीराजे हजारो शिवभक्तांसह विशाळगडाकडे जात आहेत. त्याआधीच हा प्रकार घडला असल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस तैनात करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

 Sambhaji Raje
विशाळगड अतिक्रमणमुक्त होईपर्यंत आंदोलन

दगडफेक झाल्याचं स्थानिकांनी सोशल मीडियावरून व्हिडिओ शेअर करून सांगितलं आहे. प्रत्यक्ष परिस्थिती पाहून यावर बोलू असं संभाजीराजे म्हणाले आहेत. सध्या विशाळगडावर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात शिवभक्त विशाळगडावर येणार नाहीत याची खबरदारी घेतली जात आहे.

शंभुराजे देसाई यांना यावर विचारले असता ते म्हणाले की, सध्या नेमकं काय घडलंय याची माहिती नाही. मी तात्काळ तेथील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत संपर्क करून आवश्यक त्या सूचना करेन. आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.