Kolhapur : रस्त्यावर उभे राहण्याच्या कारणावरून भोई गल्लीत दोन गटांत तुफान दगडफेक, चौघांची डोकी फुटली; डोळ्याला, चेहऱ्याला दुखापत

Kolhapur Crime : बिंदू चौकातून भोई गल्लीत (Bindu Chowk Bhoi Galli) जाणाऱ्या रस्त्यावरील ब्लू स्टार ग्रुपजवळ (Blue Star Group) काही तरूण बोलत थांबले होते.
Kolhapur Crime
Kolhapur Crimeesakal
Updated on
Summary

दगडफेकीच्या काही वेळानंतर दुसऱ्या जमावाने भोई गल्ली तालमीच्या पिछाडीस केलेल्या हल्ल्यात सचिन मोरे, नीलेश यादव, रोहित कांबळे जखमी झाले.

कोल्हापूर : रस्त्यावर उभे राहण्याच्या किरकोळ कारणावरून भोई गल्लीतील दोन गटांत जोरदार हाणामारी व दगडफेकीचा प्रकार गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडला. मारहाणीत सचिन संभाजी मोरे (वय ४४), नीलेश नंदकुमार यादव (३४), रोहित सचिन कांबळे २९) व अभय विशांत पोवार (२१, सर्व रा. भोई गल्ली) जखमी झाले. दगडफेकीत दोन दुचाकींचे नुकसान झाले. घटनास्थळी मोठा पोलिस (Kolhapur Police) बंदोबस्त तैनात केला होता.

बिंदू चौकातून भोई गल्लीत (Bindu Chowk Bhoi Galli) जाणाऱ्या रस्त्यावरील ब्लू स्टार ग्रुपजवळ (Blue Star Group) काही तरूण बोलत थांबले होते. यावेळी येथून निघालेल्या निलेश यादव मोटारसायकलवरून पुढे जात होता. येथे थांबलेल्या तरुणांना त्याने बाजूला होण्यास सांगितले. यावेळी त्या तरूणांचा आणि निलेशचा वाद झाला. यानंतर दोन गट समोरासमोर येऊन दगडफेकीचा प्रकार घडला. यामध्ये अन्वर शेख, गौस बागवान यांच्या दारात उभ्या केलेल्या वाहनांचे जमावाकडून नुकसान करण्यात आले.

Kolhapur Crime
'शक्तिपीठ' मार्गाला पुन्हा 'शक्ती? शेतकऱ्यांना पाच पट मोबदला देण्याची सरकारची तयारी; राजू शेट्टींना रस्ते महामंडळाचे पत्र

दगडफेक व मारहाणीची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक आप्पासो पवार, पोलिस निरीक्षक दिलीप पवार, संजीवकुमार झाडे, उपनिरीक्षक भगवान गिरी, संतोष गळवे, विठ्ठल जाधव यांच्यासह फौजफाटा भोई गल्लीत दाखल झाला. दगडफेक, जखमींच्या नातेवाईकांकडे चौकशी सुरू केली होती. तसेच संशयितांची धरपकड करण्यासाठी पोलिस पाठविले. रात्री उशिरापर्यंत जाब जबाब नोंदविण्याचे काम सुरू होते.

Kolhapur Crime
सिद्धेश्वर साखर कारखान्याची 'ती' मागणी फेटाळली; विमानतळाच्या जागेचा वाद पुन्हा उफाळणार, काय आहे प्रकरण?

चौघांवर हल्ला

दगडफेकीच्या काही वेळानंतर दुसऱ्या जमावाने भोई गल्ली तालमीच्या पिछाडीस केलेल्या हल्ल्यात सचिन मोरे, नीलेश यादव, रोहित कांबळे जखमी झाले. तिघांच्या डोक्याला, डोळ्याला, चेहऱ्याला दुखापत झाली आहे. जखमींना तातडीने सीपीआर रुग्णालयात हलविले. घटनेची माहिती मिळताच जखमींचे नातेवाईक, मित्र परिवाराने सीपीआर आवारात गर्दी केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.