नारळाच्या करवंटींपासून पक्ष्यांसाठी घरटी

Students Built Nests For Parties Kolhapur Marathi News
Students Built Nests For Parties Kolhapur Marathi News
Updated on

उत्तूर : चिमणी, पक्ष्याच्या संवर्धनासाठी उत्तूर (ता. आजरा) येथील हुन्नर गुरुकूलच्या विद्यार्थ्यांनी हॉटेलमधुन नारळाच्या करवंटी मिळवून त्या पासून सुंदर घरटी तयार केली आहेत. परिसरातील विद्यार्थ्यांना ही घरटी वितरीत करण्यात आली. 

पांडूरंग जाधव यांनी स्वागत केले. या वेळी बोलताना संस्थेचे संचालक अनिरुद्ध बनसोड म्हणाले, ""चिमणी हा केवळ मानवी सहवासातच राहू शकणारा पक्षी आहे. पर्यावरणात त्याचे महत्त्वाचे स्थान आहे, पण सातत्याने घटत जाणारी त्यांची संख्या लक्षात घेऊन त्यावर उपाययोजनात्मक कार्यवाहीची गरज निर्माण आहे. त्यांच्या घटणाऱ्या संख्येवर उपाययोजना म्हणून आमच्या संस्थेतील विद्यार्थांची व शिक्षकांची बैठक झाली.

या वेळी टाकावूपासून टिकावू वस्तू तयार करावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून नारळाच्या करवंटीपासून घरटी तयार करण्याचा निर्णय झाला. यासाठी आम्ही परिसरातील हॉटेलमध्ये जावून हॉटेल मालकांना नारळाच्या रिकाम्या करंवटी देण्याचे आवाहन केले. यानुसार हॉटेल कोल्हापूरी किचनमधून आम्हाला दिडशे करवंटी उपलब्ध झाल्या. या करवंटीपासून विद्यार्थ्यांनी शंभर सुंदर घरटी तयार केली.

यामध्ये चारा, पाणी व चिमण्यासाठी कृत्रिम घरटे बनवले आहे. या वेळी शिक्षक सुनिल सुतार, नकुल ढोमणे, गणेश सुतार उपस्थित होते. सुशांत सुतार, सुशांत कुंभार, सतिश कुलकर्णी, सौरभ सुतार, गणेश जावळकर, विशाल ठाकूर, हेमंत नेवडे, रोहीत नंदिवाले या विद्यार्थानी ही घरटी बनवली. 

चिमण्या वाचविण्यासाठी हातभार
चिमणी कीड खाणारा शेती पिकांसाठी नैसर्गिक कीडनाशकाचे कार्य करणारा आहे. सिमेंटच्या जंगलांमध्ये वळचणींच्या जागेचा अभाव, बेसुमार वृक्षतोड, अन्न व पाण्याचे दुर्भिक्ष्य, शेतीपिकांवर होणारा कीटकनाशकांचा वाढता वापर अशा अनेक कारणांनी चिमण्या कमी होत आहेत. शहरांतून तर चिमण्या जवळपास हद्दपारच झाल्या आहेत. दै "सकाळ'ने राबवलेल्या "चिमण्या वाचवूया' उपक्रमास हातभार म्हणून आम्ही हा प्रयोग राबवला आहे. 
- अनिरुद्ध बनसोड, संचालक, हुन्नर गुरुकुल 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.