'विशाळगडावर ज्यांनी तोडफोड केली, त्यांच्यावर दहशतवादी कृत्याचे कलम लावून कारवाई करा' : आमदार अबू आझमी

Vishalgad Riots : ज्यांनी तोडफोड केली त्यांच्यावर दहशतवादी कृत्याचे कलम लावून कारवाई करावी.
Samajwadi Party MLA Abu Azmi
Samajwadi Party MLA Abu Azmiesakal
Updated on
Summary

''पोलिसांसमोर विशाळगड, गजापूरमध्ये प्रकार घडला. ती एकप्रकारे दंगलच आहे. त्यावेळी सरकार झोपले होते काय?''

शाहूवाडी : फजियाबादच्या माजी खासदार सुभाषिनी आली व समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी काल गजापूर (ता. शाहूवाडी) येथे भेट देऊन पाहणी केली. नुकसानग्रस्तांना मदतीसाठी वरिष्ठ पातळीवर सहकार्य करण्याचे अश्वासन त्यांनी दिले.

विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. गजापूर येथे दगडफेक, जाळपोळ व वाहनांची मोडतोड करून आंदोलकांनी मोठे नुकसान केले होते. अली व आझमी यांनी नुकसान झालेल्या घरांची, सार्वजनिक ठिकाणांची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला.

Samajwadi Party MLA Abu Azmi
Vishalgad Riots : 'पोलिसांसमोरच विशाळगड-गजापूरमध्ये दंगल, संविधानाचे धिंडवडे निघाले'; अबू आझमींनी व्यक्त केला संताप

यावेळी आझमी म्हणाले, विशाळगडावरील १४४ कलम हटवून तेथील जनजीवन पूर्ववत करावे. गजापूरमधील नुकसानग्रस्तांना रोज एक हजार रुपयांप्रमाणे भरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. पोलिसांसमोर विशाळगड, गजापूरमध्ये प्रकार घडला. ती एकप्रकारे दंगलच आहे. त्यावेळी सरकार झोपले होते काय? या प्रकरणामुळे संविधानाचे धिंडवडे निघाले आहेत. या प्रकरणी पोलिस प्रशासनाने दिलेले स्पष्टीकरण चुकीचे आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांना त्वरित निलंबित करावे. ज्यांनी तोडफोड केली त्यांच्यावर दहशतवादी कृत्याचे कलम लावून कारवाई करावी.’

Vishalgad Riots
Vishalgad Riotsesakal

यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भारत पाटील, सिकंदर जमादार, समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी परुळेकर, राजेंद्र देशमाने, दस्तगीर अत्तार, जमीर जमादार, ईसाफ मालदार, ईस्माईल काझी, ए. बी. पाटील, सुभाष जाधव, प्रा. आबासाहेब चौगुले आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.