Startup: नंद्याळच्या तरुणांचा 17 राज्य, 13 देशांत डंका

ग्रीन रेव्‍हॉल्युशनचा ३५ लोकांचा उच्‍चशिक्षितांचा चमू आहे.
ग्रीन रेव्‍हॉल्युशनचा ३५ लोकांचा उच्‍चशिक्षितांचा चमू आहे. sakal
Updated on

कोल्‍हापूर : शेतीतून अधिक उत्‍पन्‍न मिळावे म्‍हणून वाढत चाललेला रासायनिक खतांचा वापर, त्यातून वाढत चाललेले किडीचे प्रमाण, किडीला नियंत्रणात आणण्यासाठी होत असलेला कीटकनाशकांचा वापर, या कीटकनाशकांमुळे मानवी आरोग्यावर होत असलेले परिणाम यामुळे लोकांमध्ये एक भीतीचे वातवरण आहे. यातूनच सेंद्रिय, विषमुक्‍त शेतीची चर्चा होत आहे. याला पूरक व शेतकऱ्यांना परवडेल असे तंत्रज्ञान शोधण्याचे काम नंद्याळ (Nandyal) (ता. कागल) येथील अमरसिंह पाटील (Amarsinh Patil)व त्यांच्या ग्रीन रेव्‍हॉल्युशन कंपनीच्या (Green Revolution Company)चमुने केले. गंधयुक्‍त सापळ्यांची अत्यल्‍प खर्चात निर्मिती करत कीड नियंत्रण करण्याचे आव्‍हान त्यांनी पेलले आहे. त्यामुळेच १७ राज्य आणि १३ देशांत नंद्याळ या छोट्याशा गावातून हजारो गंधयुक्‍त सापळ्यांची विक्री होत आहे.

मातीचे ऋण फेडण्यासाठी...

शेती हा अर्थव्यवस्‍थेचा व जगण्याचा आधार. शेतीत पिकांचे अधिकाधिक उत्‍पादन घेण्याची स्‍पर्धा आहे. त्यातूनच पिकांवर वेगवेगळ्या किटकांचा हल्‍ला होत आहे. जिल्ह्या‍तही हुमणी, लष्करी अळीचा मोठा प्रादुर्भाव आहे. विविध पिके, फळं आणि फळभाज्यांवर विविध कीड पडते. या किडीचे नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशकांचा वापर होतो. मात्र, अनेक कीटकनाशकांचा मानवी आरोग्यावर दुष्‍परिणाम होतो. त्यातुळे कीड नियंत्रण करत असतानाच लोकांच्या आरोग्यावरही परिणाम होणार नाही, अशा उपाययोजना राबवण्याच्या तयारीनेच पाटील यांनी ग्रीन रेव्‍हॉल्युशनची स्‍थापना मातीचे ऋण फेडण्यासाठी नंद्याळ गावातच केली.

पिकांचे नुकसान कमी

या माध्यमातू कीड नियंत्रणसासाठी गंधयुक्‍त सापळे (ल्‍युर ट्रॅप) तयार करण्यात येतात. यामध्ये सापळ्यामध्ये मादीचा कृत्रिम गंध तयार करून नर किटकांना आकर्षित करण्यात येते. हे कीटक सापळ्यात अडकून नष्‍ट होतात. त्यामुळे मादीपासून प्रजनन होत नाही आणि कीड नियंत्रणात यश येते. या गंधयुक्‍त सापळ्यांमुळे ७० ते ८० टक्‍के कीड नियंत्रण होते असा कंपनीचा दावा आहे. कीड नियंत्रण झाल्याने पिकांचे होणारे नुकसान कमी होते. कीटकनाशकांचा वापर कमी झाल्याने आरोग्यावरही विपरीत परिणाम होत नाही. त्यामुळेच या गंधयुक्‍त सापळ्यांना मागणी वाढली आहे. गावातील व परिसरातील ३० ते ३५ तरुणांना एकत्र करून या कंपनीने देशात आणि विदेशातही छाप उमटवली आहे.

ग्रीन रेव्‍हॉल्युशनचा ३५ लोकांचा उच्‍चशिक्षितांचा चमू आहे.
'स्वाभिमानी' शेतकरी नाही तर राजकीय संघटना : राजू शेट्टींवर घणाघात

प्रकल्‍पातून जनजागृती

ग्रीन रेव्‍हॉल्युशनचा ३५ लोकांचा उच्‍चशिक्षितांचा चमू आहे. गंधयुक्‍त सापळे विकून व्यवसाय करणे हाच केवळ एकमेव उद्देश नाही, तर कीड नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांचे मोफत प्रबोधन करण्याची जबाबदारी आयपीएम स्‍कूलच्या माध्यमातून पार पाडत आहे. यामध्ये शेतकऱ्यांसह कृषी खाते, कृषी विज्ञान केंद्र, अशासकीय संस्‍था, कृषी कॉलेजचे विद्यार्थी यांनाही प्रशिक्षणात सहभागी करून घेण्यात येते. प्रशिक्षणाची जबाबदारी ओंकार पाटील, प्रतीक पाटील पार पाडतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.