Latest Maharastra News: कर्नाटकपाठोपाठ महाराष्ट्र राज्यातही यंदाचा ऊस हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय मंत्री समितीने घेतला आहे. यंदा उसाची पळवापळवी होणार नाही, असा अंदाज आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील कारखाने कर्नाटक सीमाभागातील उसाची तोड करतात. कर्नाटकातील कारखानेही पश्चिम महाराष्ट्रातील ऊस आणतात. उसाचे आंदोलन सुरू झाले की, दोन्ही राज्यांच्या कारखान्यावर याचा परिणाम होतो. प्रत्येक वर्षी कर्नाटकचा हंगाम लवकर सुरू होतो.