गडहिंग्लज : आगामी ऊस गळीत हंगाम १५ ऑक्टोबरनंतर सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज उपविभागातील साखर कारखाने गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यादृष्टीने कामे हातावेगळी करण्याची यंत्रणा गतिमान केली असून अधिकाधिक गाळपाचे उद्दिष्ट ठेवून हालचाली सुरू आहेत.
या विभागात गडहिंग्लजला आप्पासाहेब नलवडे, आजऱ्यात आजरा शेतकरी साखर कारखाना, चंदगड तालुक्यात ओलम शुगर, दौलत साखर कारखाना आणि इको केन अशी कारखाने गाळप करतात. दरम्यान, दोन गळीत हंगाम बंद असलेला या उपविभागातील आजरा साखर कारखाना यंदा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गडहिंग्लजमधील ‘गोडसाखर’चा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे.
उणे नेटवर्थमुळे कारखान्याला अर्थसाहाय्य होण्यात अडचणी असल्याने पुन्हा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव सर्वसाधारण सभा आणि संचालक मंडळाने केला आहे. हंगामासाठी कारखान्यातील अंतर्गत मशिनरींची कामे पूर्ण करुन घेण्यासाठी धडपड सुरू केली आहे. सर्व कारखान्यांनी मिल रोलरचे पूजन केले आहे. साधारण दसऱ्याच्या दरम्यान कारखान्यांचे बॉयलर अग्निप्रदीपन होते. त्यानंतर आठवडा ते पंधरावड्याने गाळपाचा प्रांरभ केला जातो. यामुळे दसऱ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करून घेण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
महापुराने नुकसान
जुलैमध्ये गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील नद्यांना आलेल्या महापुराने नदीकाठावरील उसाचे पीक पाण्याखाली गेले. पूर्ण बुडालेल्या उसाची उत्पादकता कमी येणार आहे. परंतु, नदीकाठापेक्षा इतर क्षेत्रात उसाचे प्रमाणही वाढल्याने उसाची इतकी टंचाई भासणार नसल्याचे जाणकारांचे मत आहे. कारखान्यांना पुरेल इतका ऊस उपलब्ध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.