शेतकऱ्यांचे लुटलेले पैसे विधानसभा निवडणुकीत वाटले जाणार आहेत. त्यामुळे या पैशाची इमान राखण्याची गरज नाही. विधानसभा निवडणुकीत मुलांच्या भविष्यासाठी उमेदवारांची निवड करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
जयसिंगपूर : यावर्षी तुटणाऱ्या उसाला विनाकपात प्रतिटन ३७०० रुपये, तसेच गतवर्षीचे प्रतिटन दोनशे रुपये दिल्याशिवाय कारखाने (Sugar Factory) सुरू करू दिले जाणार नाहीत. कारखानदारांकडे तीन आठवडे वेळ आहे, त्यांनी विचार करावा. ३७०० रुपयांपेक्षा कमी दर घेणार नाही; अन्यथा गाठ आमच्याशी आहे, असा सज्जड इशारा स्वाभिमानी शेतकरी (Farmer) संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी येथे कारखानदारांना दिला.