ऊसदराचा दोन दिवसांत निर्णय द्या, अन्यथा राष्ट्रीय महामार्ग रोखणार; राजू शेट्टींचा कारखान्यांना कडक इशारा

उसाला अपेक्षित दर मिळावा, यासाठी शेट्टी यांनी तेरा सप्टेंबरपासून आंदोलन सुरू आहे.
Shetkari Andolan Raju Shetti
Shetkari Andolan Raju Shettiesakal
Updated on
Summary

जिल्ह्यातील अनेक ठिकाणी तब्बल दोन तासांहून अधिक काळ चक्काजाम केल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या.

कोल्हापूर : गेल्या वर्षी गाळप झालेल्या उसाचा दुसरा (Sugarcane Rate) हप्ता ४०० रुपये आणि यावर्षीच्या उसाला तीन हजार ५०० पहिली उचल द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काल (रविवार) जिल्‍हाभर चक्काजाम आंदोलन (Shetkari Andolan) केले. कोल्‍हापूर, सांगली महामार्गासह ग्रामीण भागातही या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला.

यावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये काही ठिकाणी शाब्दिक बाचाबाची झाली. दरम्यान, दोन दिवसांत निर्णय न झाल्यास रविवारी (ता. २६) राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी हातकणंगले येथे दिला.

Shetkari Andolan Raju Shetti
Bhogavati Factory Election Results : टक्का वाढला, धक्का कुणाला? 'भोगावती'चा आज फैसला; कोल्हापुरात होणार मतमोजणी

उसाला अपेक्षित दर मिळावा, यासाठी श्री. शेट्टी यांनी तेरा सप्टेंबरपासून आंदोलन सुरू आहे. २१ दिवस आक्रोश पदयात्रा काढून उसाला दर द्यावा, या मागणीचे निवेदन साखर कारखान्यांना दिले. त्याशिवाय तोडगा निघण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तीन वेळा बैठका घेण्यात आल्या. मात्र, हा प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही. त्यामुळे श्री. शेट्टी यांनी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील ऊस असणाऱ्या भागांमध्ये चक्काजाम आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

काही मार्गांवरील बससेवा सकाळी दहा ते दुपारी बारापर्यंत स्थगित ठेवण्यात आली. दुपारनंतर सर्व वाहतूक सुरळीत सुरू झाली. मंगळवारी (ता. २१) स्वाभिमानी शेतकरी संघटना, कारखानदार आणि प्रशासनाची समन्वय बैठक होणार आहे. त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Shetkari Andolan Raju Shetti
राज्यात धुमधडाक्यात हंगाम, पण शेट्टींच्या आंदोलनाची कारखानदारांना धास्ती; कोल्हापुरात फक्त 'इतकेच' कारखाने सुरू

येथे झाली आंदोलने...

जिल्ह्यातील अनेक ठिकाणी तब्बल दोन तासांहून अधिक काळ चक्काजाम केल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. जिल्ह्यात अंकली टोल नाका, चौंडेश्वरी फाटा, नृसिंहवाडी, कबनूर, नदीवेस-इचलकरंजी, हेरवाड, हुपरी, वडगाव, कागल, गडहिंग्लज, चंदगड, शाहूवाडी, कोडोली, परिते, तावडे हॉटेल, शिये, हातकणंगले, भोगावती, कोपार्डे, उत्तूर, शाहूवाडी, बांबवडे, अडकूर, पाटणे फाटा, कोवाड, आदी ठिकाणी आंदोलन झाले. यावेळी श्री. शेट्टी यांच्यासह ‘स्वाभिमानी’च्या स्थानिक कार्यकर्त्यांनी कारखानदारांवर जोरदार टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.