Hasan Mushrif : 'तो शब्द अनावधानानं माझ्या तोंडून गेला'; असा कोणता शब्द होता, ज्यामुळं मुश्रीफांना घ्यावा लागला यूटर्न

'इचलकरंजी समन्वय समितीने सामंजस्याने कृष्णेतून पाण्यासाठी प्रयत्न करावेत.'
Sulkud Water Scheme Dispute Hasan Mushrif
Sulkud Water Scheme Dispute Hasan Mushrifesakal
Updated on
Summary

इचलकरंजी शहरातील नागरिक हे आमचेच नागरिक आहेत. त्यांच्या अनेक पिढ्यांना शुद्ध पाणी मिळाले पाहिजे, याबद्दल दुमत असण्याची कारण नाही.

कोल्हापूर : कोल्हापुरात दोन दिवसांपूर्वीच दूधगंगा काठावरील संतप्त शेतकऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी दूधगंगेतून पाण्यासंदर्भात अनावधानाने माझ्याकडून गेलेला ‘रक्तपाता’ सारखा शब्द टाळता आला असता तर बरे झाले असते, असे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिले आहे.

Sulkud Water Scheme Dispute Hasan Mushrif
Loksabha Election : शरद पवारांची मोठी खेळी, शाहू महाराजांना उतरवणार लोकसभेच्या रिंगणात? म्हणाले, जनतेच्या मनात..

दूधगंगा काठावर झालेली लोकजागृती आणि लोकभावनांचा उद्रेक पाहता इचलकरंजीला (Ichalkaranji) दूधगंगेतून पाणी मिळणे केवळ अशक्य असल्याचेही त्यांनी यासंदर्भात प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. इचलकरंजी समन्वय समितीने सामंजस्याने कृष्णेतून पाण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी आम्ही त्यांना सहकार्य करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे.

पत्रकात म्हटले आहे, दूधगंगा नदीतील पाणीप्रश्नी महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली होती. भुदरगड, राधानगरी, करवीर, कागल, शिरोळ या पाच तालुक्यातील आणि कर्नाटकच्या सीमाभागातील दूधगंगा काठावरील शेतकऱ्यांची बैठक झाली.

Sulkud Water Scheme Dispute Hasan Mushrif
Hasan Mushrif : सुळकूड योजनेतून इचलकरंजीला पाणी दिल्यास रक्तपात होईल; मुश्रीफांचा कडक शब्दात इशारा, काय आहे वाद?

त्यावेळी काळमवाडी धरणातील पाणीसाठा संपल्यामुळे पिण्यासह शेतीच्या पाण्याचीही प्रचंड टंचाई निर्माण झाल्यामुळे जनता अक्षरशः कासावीस झाली होती. त्यावेळी आणि परवा झालेल्या बैठकीतही अनेक संतप्त वक्त्यांनी रक्तपाताची भाषा केली. तेच वाक्य अनावधानाने माझ्याकडून गेले. हा शब्द टाळता आला असता तर बरे झाले असते.

Sulkud Water Scheme Dispute Hasan Mushrif
Loksabha Election : RPI ला सोबत घेतल्याशिवाय महायुतीला राज्यात सत्ता आणणं अशक्य; रामदास आठवलेंचं मोठं विधान

आतापर्यंत इचलकरंजी शहरासाठी अनेक पाणी योजना झाल्या. कृष्णा नदीवरून मजरेवाडी येथून पाणी योजनाही झाली आहे. इचलकरंजी शहरातील नागरिक हे आमचेच नागरिक आहेत. त्यांच्या अनेक पिढ्यांना शुद्ध पाणी मिळाले पाहिजे, याबद्दल दुमत असण्याची कारण नाही. परंतु, ती योजना आता कृष्णा नदीतून मजरेवाडीवरूनच झाली पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Sulkud Water Scheme Dispute Hasan Mushrif
Kolhapur NCP Sabha : शरद पवारांनंतर कोल्हापूरच्या तपोवन मैदानावर धडाडणार अजितदादांची तोफ; कधी सभा, कोणावर साधणार निशाणा?

मुख्यमंत्री शिंदें यांना भेटणार

‘इचलकरंजी शहराला दूधगंगेतून पाणी देण्यामध्ये दूधगंगा काठावरील ग्रामस्थांमध्ये प्रचंड उठाव होऊन प्रक्षुब्धता निर्माण झाली आहे. मी, खासदार संजय मंडलिक आणि आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर आम्ही मिळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून घेऊन या योजने संदर्भात बैठक घेण्याआधी इचलकरंजी शहरासाठी झालेल्या सगळ्या योजनांचा आढावा घ्या. त्यांचे सोशल ऑडिट करा आणि मगच बैठक घ्या, असे सांगणार आहोत’, असेही मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.