तीन दिवसांच्या बाळाला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी केले शर्थीचे प्रयत्न ; अखेर मिळाले यश

surgery of gut 3 days child successfully by doctors in kolhapur after 22 days child supported the surgery
surgery of gut 3 days child successfully by doctors in kolhapur after 22 days child supported the surgery
Updated on

कोल्हापूर :  तीन दिवसांपूर्वी जन्मलेल्या नवजात बालकाला आंतड्याच्या गुंतागुंतीचा आजार होता. उपचारापेक्षा या बाळाला जन्मच देणे आव्हान होते. अशा मनस्थितीत हवालदिल झालेल्या मातापित्यांनी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये त्याला स्वाधीन  केले. येथील बालरोग तज्ज्ञांनी तीन दिवसांच्या आणि कमी वजनाच्या  बालकावर लहान आतड्यातील गुंतागुंतीची अवघड शस्त्रक्रिया यशस्वी केली.

मंगळवार पेठेतील एका महिलेला गरोदरपणी केलेल्या सोनाग्राफीत बाळाचे लहान आतडे पुरेसे विकसित होत नसल्याचे डॉक्‍टरांच्या लक्षात आले होते. घरची बेताची परिस्थिती असलेल्या या मातेवर मोठे दडपण होते. तिला कुटंबीयांनी प्रसूतीसाठी  डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. बाळाला पूर्ण दिवस भरण्याअगोदर प्रसूती करावी लागली. अर्भकाचे जन्मावेळचे वजन केवळ १ किलो ९७० ग्रॅम होते.  नवजात अर्भक अतिदक्षता कक्षात प्रथमोपचार सुरू केले. नंतर अल्ट्रासाउंड स्कॅनिंग केले.   अर्भकाची फुफ्फुसेही विकसित नव्हती, त्याला मातेचे दूधही दिल्यावर ते आंतड्यात जाणारच नव्हते.  

बाळाला तीन दिवस सलाईनवर ठेवून निरीक्षण केले. डॉक्‍टरांच्या सल्ल्याने तिसऱ्या दिवशी बाळाची शस्त्रक्रिया केली.  लहान आतड्याला पीळ पडून आतड्याचा काही भाग अविकसित असलेला भाग काढून टाकून आतडे पुन्हा जोडून शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली. ऑपरेशननंतर बाळाची तब्येत सुधारली आहे. २२ दिवसांनंतर बाळ दूध पचवत आहे. ही शस्त्रक्रिया डॉ. सूरज दिघे यांनी केली, तर डॉ. निवेदिता पाटील व  डॉ. विजय माळी यांनी विशेष काळजी घेतली. तसेच बालरोग विभागप्रमुख डॉ. अनिल कुरणे भूलशास्त्र विभागप्रमुख  डॉ. कल्पना कुलकर्णी,  मेडिकल सुपरिटेंडेंट डॉ. वैशाली गायकवाड, डीन डॉ. आर. के. शर्मा आणि कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचे  सहकार्य मिळाले.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.