नूलच्या मठाचे मठाधिपती चंद्रशेखर महास्वामीजी यांचे निर्वाण

chandrashekhar mahaswamiji
chandrashekhar mahaswamiji
Updated on

नूल (कोल्हापूर) : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले नूल (ता. गडहिंग्लज) येथील सुरगीश्‍वर मठाचे मठाधिपती षठस्थळ ब्रम्ही उपाचार्यरत्न श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे वयाच्या 86 व्या वर्षी महानिर्वाण झाले. आज (ता. 27) पहाटे साडेपाच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. दहाव्या शतकामध्ये श्री गुरूबसव लिंग शिवाचार्य महास्वामीजी यांनी स्थापना केलेल्या सुरगीश्‍वर मठाचे हे 12 वे मठाधिपती म्हणून कार्यरत होते.

दरम्यान, आज दुपारी मठापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार निघाली. मठामध्येच समाधी स्थळ बांधण्यात आले आहे. गावातून अंत्ययात्रा निघाल्यानंतर सायंकाळी पाचला त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

कर्नाटकातील हुक्केरी (जि. बेळगांव) तालुक्यातील कणगला येथे 6 एप्रिल 1938 रोजी स्वामीजींचा जन्म झाला. कला शाखेतून पदवीचे शिक्षण घेऊन बेंगलोर येथे संस्कृत साहित्य अलंकारमध्ये सुवर्णपदक मिळविले. पंचाग शास्त्रात ते निपून होते. 1977 मध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीत रंभापूरी आणि काशी जगद्गुरूंच्या सानिध्यात नूल येथील सुरूगीश्‍वर मठासाठी त्यांचा पट्टाभिषेक कार्यक्रम पार पडला होता. तेव्हापासून ते महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान होते.

Summary

गावातून अंत्ययात्रा निघाल्यानंतर सायंकाळी पाचला त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

अलिकडे वर्षभरापासून त्यांना आरोग्याचा त्रास सुरू झाला होता. दीड महिन्यापूर्वी उपचारासाठी बेळगाव येथील केएलई रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दीड महिन्यापूर्वी त्यांना मठात आणले होते. दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावत होती. आज पहाटे साडेपाचला त्यांची प्राणज्योत मालवली.

chandrashekhar mahaswamiji
दुखा:तून सावरत वडणगेच्या प्रणालीने केले वडिलांचे स्वप्न साकार

दरम्यान, स्वामीजींच्या निधनाची बातमी सोशल मिडीयावरून वार्‍यासारखी पसरली. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्रच्या सीमाभागातून हजारो भाविक मठाकडे येत होते. अंत्यदर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. निडसोशी मठाचे महास्वामीजी पंचम शिवलिंगेश्‍वर यांनी अंत्यदर्शन घेतले.

विठ्ठल चौगुले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.