'स्वाभिमानी'चा महाविकास आघाडीला राम राम

महिनाभरात राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊन निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
Raju shetti
Raju shettie sakal
Updated on
Summary

महिनाभरात राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊन निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

जयसिंगपूर : घरगुती वीज बिल माफीचे गाजर, पूरग्रस्तांना तुटपुंजी मदत आणि आता एफआरपीचे तुकडे या मुद्द्यांवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीला राम राम ठोकण्याच्या पवित्र्यात आहे. महिनाभरात राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊन निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. २०२४ च्या लोकसभेचेही संदर्भ याला जोडले जात आहेत.
२०१७ ला शेतमालाला दीडपट हमीभाव आणि कर्जमुक्तीच्या मागणीवरून पदरी निराशा आल्याने स्वाभिमानी एनडीएतून बाहेर पडली. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांना भाजपकडून दिले जाणारे पाठबळ आणि राजकारण ओळखून स्वाभिमानीने एनडीएला रामराम ठोकला.

Raju shetti
T20 World Cup :आयर्लंडला रोखत श्रीलंका सुपर 12 साठी क्वॉलिफाय

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी महाविकास आघाडीची रचना करत असताना कॉंग्रेस, राष्ट्रवादीकडून राज्यपालनियुक्त आमदारकीची जागा देण्यावर एकमत झाले. श्री. शेट्टी यांना आमदारकीची ऑफर दिली. मंत्री जयंत पाटील यांनी शेट्टी यांच्या निवासस्थानी भेट देऊन ही ऑफर देताना बारामतीचेही निमंत्रण दिले. निमंत्रण स्वीकारून शेट्टी यांनी बारामती गाठत शरद पवार यांचा पाहुणचारही स्वीकारला.

या आमदारकीवरून स्वाभिमानीमध्ये काही काळ कलह निर्माण झाला. ऊर्जामंत्री राऊत यांनी लॉकडाउनमधील वीज बिल माफीचे आश्वासन दिले होते. नंतर वसुलीसाठीचा धडाका लावला. पाठोपाठ महापुरात शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. स्वाभिमानीच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी शेट्टी यांना मुंबईला बोलावून २०१९ च्या धर्तीवर मदतीची ग्वाही दिली होती. मात्र, तुटपुंजी मदत जाहीर केली. यातच तीन टप्प्यांतील एफआरपीला शासनाने शिफारस दिल्याने आघाडीबद्दल नाराजी आहे. ही सगळी कारणे स्वाभिमानीला आघाडीतून बाहेर पडण्यास कारणीभूत ठरणारी आहेत. महाविकास आघाडीचे नेते शेट्टी यांची कशाप्रकारे समजूत काढतात यावरच स्वाभिमानीचे महाविकास आघाडीतील अस्तित्व निश्चित होणार आहे.

Raju shetti
माजी मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यापूर्वी उदयनराजेंनी जिल्ह्यासाठी काय केलं सांगावं; काँग्रेसच्या नेत्याचं जोरदार प्रतिउत्तर

आमदारकी नको

२०२४ ची लोकसभा निवडणूक राजू शेट्टी लढणार आहेत. यापूर्वीचे अनुभव लक्षात घेता ‘एकला चलो रे’ची भूमिका हितावह ठरेल, असा सूर कार्यकारिणीतील सदस्यांचा आहे. लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राज्यपालनियुक्त आमदारकी शेट्टी नाकारतील, अशीही शक्यता आहे.

भाजपचे कौतुक मात्र

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिगुंठा ९५० रुपयांची मदत पूरग्रस्तांना दिली होती. विद्यमान सरकारने केवळ दीडशे रुपयांची मदत जाहीर केली. यावरून फडणवीसांचे कौतुक करताना मुख्यमंत्री ठाकरेंच्या वर्मावर बोट ठेवले जात आहे. मात्र, स्वाभिमानी कोणत्याही पक्षाच्या वळचणीला न जाता स्वतंत्र अस्तित्व राखेल, असा अंदाज आहे.

Raju shetti
अशास्त्रीय अतिव्यायाम धोक्याचा; व्यायामापूर्वी स्वतःची तंदुरुस्ती समजून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.