Raju Shetti : 'मी आता स्वस्थ बसणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा तो कार्यक्रम उधळणार'; राजू शेट्टींनी का दिला इशारा?

दिवाळीच्या भाऊबीजेला शेतकऱ्यांच्या माता-भगिनी साखरसम्राटांना खर्डा-भाकरी देणार आहेत.
Raju Shetti vs Devendra Fadnavis
Raju Shetti vs Devendra Fadnavisesakal
Updated on
Summary

सरकारमधील मंत्री झोपा काढत आहेत काय, शेतकऱ्यांचे १२०० कोटी रुपये बुडवू पाहणाऱ्यांवर पोलिस गुन्हे दाखल का करत नाहीत?

जयसिंगपूर : ‘मागील थकीत असलेले उसाचे पैसे व यंदाच्या पहिल्या उचलीचा प्रश्न अद्यापही मिटलेला नाही. आमचे हक्काचे पैसे जिल्ह्यातील साखर कारखानदार (Sugar Factory) लुटू पाहत आहेत. हे कारखानदार शेतकऱ्यांची खळी लुटत असतील तर मी स्वस्थ बसणार नाही, असा इशारा राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला आहे.

Raju Shetti vs Devendra Fadnavis
Kolhapur : मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगेंची दसरा चौकात धडाडणार तोफ; सभेला 2 ते 5 लाखांच्या उपस्थितीची शक्यता!

शुक्रवारी (ता. १७) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कोल्हापुरात येऊ देणार नाही. कोल्हापुरातील विमानतळाला ऊस उत्पादक शेतकरी घेराओ घालतील. तसेच शहरातील कार्यक्रमही आम्ही उधळून लावू,’ असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगितले.

Raju Shetti vs Devendra Fadnavis
'या' योजनेवरून कोल्हापुरात राजकारण तापलं; सतेज पाटील-क्षीरसागर आमनेसामने, इंगवलेंनीही घेतला बंटींचा समाचार

दिवाळीच्या भाऊबीजेला शेतकऱ्यांच्या माता-भगिनी साखरसम्राटांना खर्डा-भाकरी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, ‘जिल्ह्यात ऊसतोडी बंद आहेत. आम्ही शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे मागतो आहोत. कुणीही इथे व्यासपीठावर यावे, मी कधीही हिशेब सांगतो. साखर कारखानदार शेतकऱ्यांचे पैसे बुडवत आहेत. आम्ही सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहोत. तरीही पोलिस आमच्यावरच गुन्हे दाखल करत आहेत.

Raju Shetti vs Devendra Fadnavis
Ajitrao Ghorpade : 'ज्यांनी विश्वासघात केला, त्यांना भविष्यात संधी देणार नाही'; माजी मंत्र्यांचा स्पष्ट इशारा

सरकारमधील मंत्री झोपा काढत आहेत काय, शेतकऱ्यांचे १२०० कोटी रुपये बुडवू पाहणाऱ्यांवर पोलिस गुन्हे दाखल का करत नाहीत? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय करत आहेत. त्यांना आम्ही कोल्हापुरात येऊ देणार नाही.’ यावेळी सावकर मादनाईक, विठ्ठल मोरे, राम शिंदे, शैलेश आडके, सागर संभूशेटे, शैलेश चौगुले आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.