Government Scheme : माझी लाडकी बहीण योजनेसाठी पैसे घेणाऱ्यांवर पोलिस कारवाई करा - पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘योजनेसाठी नावनोंदणी, अर्जासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविली आहे.
Majhi Ladki Bahin Yojana Minister Hasan Mushrif
Majhi Ladki Bahin Yojana Minister Hasan Mushrifesakal
Updated on
Summary

१९ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील जास्तीतजास्त महिलांची नोंदणी होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा.

कोल्हापूर : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी (Majhi Ladki Bahin Yojana) आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरून घेणे, आदी प्रक्रियेत पैशांची मागणी होणार नाही, याची दक्षता घ्या. महिलांची अडवणूक, दिरंगाई करून पैसे घेतल्याचे आढळल्यास दोषींवर पोलिस कारवाई करावी. दलालांचा सुळसुळाट होऊ देऊ नका, असे निर्देश आज पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी येथे दिले. योजनेच्या अंमलबजावणीत जिल्हा राज्यात अग्रेसर राहिल यासाठी चोख नियोजन करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात योजनेच्या आढावा बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉ. के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे, महिला व बालविकास विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील आदी उपस्थित होते.

Majhi Ladki Bahin Yojana Minister Hasan Mushrif
'शंभूराज देसाईंना शोधा आणि एक गावठी कोंबडा, वळगणीचे मासे बक्षीस जिंका'; शरद पवार गटाच्या 'या' बॅनरची जोरदार चर्चा

मुश्रीफ म्हणाले, ‘योजनेसाठी नावनोंदणी, अर्जासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविली आहे. १९ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील जास्तीतजास्त महिलांची नोंदणी होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा. नोंदणीसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरून घेणे, छाननी करणे व ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांना सूचना देऊन गावनिहाय शिबिरांचे आयोजन करा, असे निर्देश दिले.

जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, ‘या योजनेसाठी अडचण आल्यास तहसीलदार, गटविकास अधिकारी अथवा बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.’ कार्तिकेयन यांनी या योजनेअंतर्गत आतापर्यंत झालेल्या नोंदणीत जिल्हा राज्यात अग्रेसर असल्याची माहिती दिली.

महिलांना जुलै, ऑगस्टचा लाभ मिळणार

३१ ऑगस्टपर्यंत नोंद झालेल्या सर्व लाभार्थ्यांना जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचा लाभ देण्यात येणार आहे, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

‘दिल्लीतील राजर्षी शाहूंच्या पुतळ्यात योग्य ते बदल होतील’

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यात फरक असल्याची गोष्ट माझ्याही निदर्शनास आली आहे. सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवारांच्या निदर्शनास ही बाब आणून देणार असून, यामध्ये योग्य ते बदल केले जातील, असे पालकमंत्री मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दोन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ जारी करत माझ्यावर झालेले आरोप खोटे आहेत, झालेल्या आरोपातील एकही सिद्ध झाला नाही, मी जास्त काम करतो म्हणून माझ्यावर जास्त आरोप होतात, अशा भावना व्यक्त केल्या होत्या. या प्रश्‍नावर मंत्री मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अस्वस्थतेला वाट मोकळी करून दिल्याची प्रतिक्रिया दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.