आजरा (कोल्हापूर) : वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये करून देण्यासाठी 75 हजार रुपयांची लाच स्विकारतांना उपलेखापाल तथा प्रभारी नायब तहसीलदार संजय श्रीपती इळके, (वय 52) रा. उतूर (ता. आजरा) व इटे (ता. आजरा) या सजाचा तलाठी राहूल पंडीतराव बंडगर (वय33) मूळ रा. महाडिक काॅलनी, प्लाॅट न. 27. ई. वार्ड कोल्हापूर (Kolhapur)या दोघांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. येथील तहसीलदार कार्यालयात साफळा लावण्यात आला होता. आज दुपारी दीडच्या सुमाराला कारावाई करण्यात आली. तक्रारदाराने याबाबतची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापुर यांच्याकडे आज दिली आहे.
तक्रारदाराने वर्ग 2 ची जमिन वर्ग 1 मध्ये करून द्यावी यासाठी इटे सजाचे तलाठी राहूल बंडगर यांची पंधरा दिवसांपुर्वी भेट घेतली होती. या वेळी बंडगर यांनी उपलेखापाल इळके व स्वतःला यासाठी 1 लाख 50 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगीतले होते. दरम्यान तक्रारदाराने एवढी रक्कम आपल्याला देणे शक्य नसल्याचे सांगीतले. त्यामुळे तडजोडी अंती 75 हजार रुपये देण्याचे ठरले.
आज ही रक्कम तहसीलदार कार्यालयातील इळके यांच्या कक्षात तक्रारदांराकडून स्विकारतांना इळके व बंडगर यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेचे पोलीस उपआयुक्त तथा पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस उपआयुक्त सुहास नाडगोंडा, पोलीस उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश मोरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सजीव बंबर्गेकर, पोलीस हवालदार अजय चव्हाण, पोलीस नाईक सुनिल घोसाळकर, रुपेश माने यांनी कारवाई केली.
महसुलमधील तालुक्यातील दुसरी कारवाई
आजरा तालुक्यात पाच वर्षांपुर्वी तहसीलदारांच्यावर कारवाई झाली होती. या प्रकरणाचा निकाल नुकताच लागला आहे. त्यानंतर महसुलमधील ही दुसरी मोठी कारवाई आहे. आज ही कारवाई झाल्यावर महसुल कार्यालयात सन्नाटा पसरल्याचे दिसून आले. पुर्ण कार्यालयात शुकशुकाट दिसत होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.