आजरा : टस्कराच्या धुमाकुळाने उन्हाळी पिकांचे नुकसान, घाटकरवाडी ग्रामस्थांत भिती

taskar damages farm of ghatkarwadi ajara summer crops destroyed in kolhapur
taskar damages farm of ghatkarwadi ajara summer crops destroyed in kolhapur
Updated on

आजरा (कोल्हापूर) : घाटकरवाडी (ता. आजरा) येथे गावात अचानक टस्कर घुसल्याने ग्रामस्थांची चांगलीच भांबेरी उडाली. काल शनिवार (१३) सायंकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला. अथक प्रयत्नानंतर त्याला हुसकावून लावण्यात ग्रामस्थांना यश आले. दरम्यान त्याने मका, केळी व शेतीच्या पाइपलाइनचे नुकसान केले आहे. गेले दोन - तीन दिवस घाटकरवाडी आणि धनगर मळा परिसरात टस्कर धुमाकूळ घालत आहे. त्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. 

काल अचानक तो सायंकाळी घाटकरवाडी गावात घुसला. टस्कराने शरद डेळकर आणि सुभाष पाटील यांच्या घरासमोरील केळीचे नुकसान केले. टस्कर गावात आल्याचे समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला पाहताच ग्रामस्थांची चांगली भांबेरी उडाली. त्याच्या चित्काराने ग्रामस्थांची पाचावर धारण बसली. काहीजणांनी धाडस दाखवत त्याच्या अंगावर विजेरीचा प्रकाशझोत टाकला. हाकारे देत त्याला गावाच्या बाहेर हुसकावून लावले. टस्कराने गंगाराम डेळेकर यांच्या शेतातील मक्याचे नुकसान केले आहे. त्याचबरोबर विठ्ठल अडकूरकर यांच्या शेती पाइपलाइनचे नुकसान केले आहे. गेले दोन तीन दिवस त्याचा या परिसरात वावर सुरू असल्याने ग्रामस्थांसह शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.  

"शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून तयार केलेली उन्हाळी पीकांचे टस्कर नुकसान करत आहे. परिणामी हातातोंडाशी आलेले पिकाचे नुकसान पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे. वन विभागाने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे."                  

 - गंगाराम डेळेकर , उपाध्यक्ष  आजरा तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटना. 

संपादन - स्नेहल कदम      

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.