Kolhapur Crime : शाळेतील महिला मदतनीसाशी गैरवर्तन; कोरोचीत मुख्याध्यापकाला चोपले, ग्रामस्थ आक्रमक

Hatkanangale Crime : दोन दिवसांपूर्वी मुख्याध्यापकाच्या गैरवर्तनाबाबत शाळेतील मदतनीस महिलेने ग्रामपंचायत (Gram Panchayat) सदस्यांकडे तक्रार केली.
Hatkanangale Crime
Hatkanangale Crimeesakal
Updated on
Summary

मुख्याध्यापकाला मारहाण करतानाचा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला. त्यानंतर घटनास्थळी शहापूर पोलिसांच्या पथकासह निरीक्षक सचिन सूर्यवंशी दाखल झाले.

कबनूर : कोरोची (ता. हातकणंगले) येथील एका शाळेत गैरवर्तनाच्या संशयातून ग्रामस्थांनी मुख्याध्यापकाला चोप दिल्याची घटना घडली आहे. मदतनीस महिलेला (Woman) गैरवर्तन केल्याचा जाब विचारण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांनी संतापाच्या भरात त्यांना मारहाण केली. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने प्रकरण अधिकच चिघळले. जमाव वाढल्याचे पाहून मुख्याध्यापकाने शाळेतून पलायन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.