कोल्हापूर : सध्या उजाड होत चाललेल्या टेंबलाई टेकडीचा कायापालट होणार आहे. त्याचा आराखडा अंतिम टप्प्यात असून, लवकरच त्याचे अंदाजपत्रक तयार करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली जाईल. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
टेंबलाई आणि मरगाई देवीचे जागृत स्थान म्हणून टेंबलाई टेकडी प्रसिद्ध आहे. शहरातच असलेले हे ठिकाण धार्मिक आणि पर्यटन दोन्ही दृष्टीने महत्त्वाचे आहे. काही वर्षांपूर्वी तेथे गणेशमूर्ती, भालदार, चोपदार यांच्यासह अन्य सुशोभीकरण झाले होते. मात्र, पुढे त्याची देखभाल दुरुस्ती योग्य पद्धतीने न झाल्याने अलीकडे त्याची वाटचाल उजाड होण्याकडे चालली आहे. धार्मिक आणि पर्यटन अशा दोन्ही बाजूंनी टेकडीचा विचार करून त्याचा आराखडा तयार केला जातो. वास्तुविशारदांकडून हे काम अंतिम टप्प्यात असल्याचे देवस्थान समितीकडून सांगण्यात आले.
टेकडीचा कायापालट करताना टेंबलाई आणि मरगाई देवीचे मूळ धार्मिक महत्त्वही जोपाणार मंदिरावर सध्याची रंगरंगोटी काढून त्याला मूळ रूप देण्याचाही प्रयत्न होणार दोन भव्य कमानी उभारणे, परिसरातील कृत्रिम प्राणी, भालदार,चोपदार यांना ऊर्जितावस्था देणार पार्किंगची प्रशस्त जागा, शौचालये, दुकाने यांचाही विचार याआराखड्यात केला जात आहे.टेकडीकडे जाताना दोन मोठ्या कमानी असणार आहेत.
लॅण्डस्केप असणार आहे.खर्चाचा अंदाज घेऊन काम सुरू करणारटेकडीच्या सुशोभीकरणात नावीन्यपूर्ण असा हा आराखडा तयार होत आहे. कोल्हापुरात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाने टेकडीवर भेट दिली पाहिजे, असे त्याचे नियोजन सध्या सुरू आहे. त्याचा आराखडा तयार झाल्यावर त्यासाठी नेमका किती खर्च होणार आहे? याचा अंदाज घेऊन शक्य तितक्या लवकर हे काम सुरू करण्याचे प्रयत्न आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.