वीजदराबाबत वस्त्रोद्योग आयुक्तालयाचा नवा फतवा

वीजदराबाबत वस्त्रोद्योग आयुक्तालयाचा नवा फतवा
Updated on

इचलकरंजी (कोल्हापूर) : वीजदर सवलतीचा विषय (Electricity Concession) यंत्रमागधारकांना अत्यंत त्रासदायक ठरत आहे. या संदर्भातील वस्त्रोद्योग आयुक्तालयांने(Textile Commissioner) आता आणखी एक नवा फतवा जारी केला आहे. यामध्ये नविन चार प्रकारची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्याची सूचना केली आहे. मुळात ऑनलाईन नोंदणीची अत्यंत किचकट प्रक्रिया आहे. त्यात आता नवनविन बाबींचा अंतर्भाव केला जात असल्यामुळे बहुतांशी यंत्रमागधारक (Machine Holder)वीजदर सवलतीपासून वंचित राहण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

Textile Commissioner new order Subject to electricity concession ichalkaranji kolhapur update marathi news

मुळात महावितरणकडे यंत्रमाग उद्योगाची स्वतंत्र वर्गवारीची नोंद आहे. त्यामुळे वेगळी नोंद करण्याची आवश्यकता नाही. महावितरणकडून ही माहिती सहज उपलब्ध होवू शकते. पण वस्त्रोद्योग धोरणांतर्गत वीज दर सवलत मिळविण्यासाठी राज्य शासनाने कांही दिवसांपूर्वी वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. यामध्ये अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे नोंदणी करण्यास यंत्रमागधारकांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सद्या 31 मे ही नोंदणी करण्यासाठी दिलेली अंतिम मुदत आहे.

एकिकडे यंत्रमागधारक संघटनांनी ऑनलाईन नोंदणीची प्रक्रियाच रद्द करण्याची मागणी लावून धरली आहे. अनेक त्रुटी यामध्ये आहेत. त्यामुळे नोंदणी करतांना अनेक अडचणी येत आहेत. यातूनही कांही यंत्रमागधारकांनी नोंदणी केली आहे. पण आता वस्त्रोद्योग आयुक्ताच्या नव्या आदेशांने पून्हा यंत्रमागधारकांसमोर नवीन समस्या उभी केली आहे. शासनाकडून नवनविन माहितीची मागणी होत असल्यामुळे यंत्रमागधारक हैराण झाले आहेत.

नविन माहिती देण्याबाबत यंत्रमागधारकांसमोर अडचण

आता नविन चार प्रकारची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्याची सूचना वस्त्रोद्योग आयुक्तालयांने केली आहे. यामध्ये यंत्रमाग उद्योगामध्ये अन्य कोणते उत्पादन होत असल्याबद्दल माहिती विचारण्यात आली आहे. तर प्रकल्प सुरु असल्याबद्दल नजिकचे खरेदी -विक्रीची पावतीची मागणी केली आहे. पण मजुरी बेसवर काम करणार्‍या यंत्रमागधारकांची याबाबत मोठी अडचण होवू शकते. या शिवाय प्रकल्प एनपीए झाला नसल्याची खात्री करण्यासाठी बँकेच्या प्रमाणपत्राची मागणी करण्यात आली आहे.

वीजदर सवलत नाकारण्यासाठीच खटाटोप?

या त्रासदायक प्रक्रियेमुळे शासनाची यंत्रमागधारकांना वीज दरात सवलत न देण्याची भूमिका तर नाही ना, असा सवाल आता यंत्रमाग उद्योजकांतून व्यक्त करण्यात येत आहे. मुळात या प्रक्रीयेने यंत्रमाग उद्योजक हैराण झाले आहेत. समोर कोरोनाचे संकट आहे. दुसरीकडे यंत्रमाग उद्योग बंद ठेवण्याची वेळ आली आहे. अशातच या नव्या फतव्यामुळे यंत्रमाग उद्योगातून चिड निर्माण होत आहे. या किचकट प्रक्रियेमुळे फारच कमी यंत्रमागधारकांनी ऑनलाईन नोंदणी केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बहुतांशी यंत्रमागधारक सवलतीपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.

वीजदर सवलतीसाठी शासन नवनविन फतवे काढत आहे. त्यामुळे यंत्रमागधारक हैराण झाले आहेत. यापेक्षा शासनाने यंत्रमागधारकांना वीज सवलत द्यायची नसेल तर ते स्पष्टपणे जाहीर करावे. त्यामुळे यंत्रमागधारकांनाही पुढील निर्णय घेता येईल.

विनय महाजन- अध्यक्ष- यंत्रमागधारक जागृती संघटना

Textile Commissioner new order Subject to electricity concession ichalkaranji kolhapur update marathi news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.