Kolhapur Politics : 'परिस्थिती अत्यंत बिकट, कारखान्याची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार'

निवडणूक लागल्यास आम्ही ताकदीने या निवडणुकीत उतरणार आहोत.
Uddhav Thackeray:
Uddhav Thackeray:esakal
Updated on
Summary

कारखान्याच्या हितासाठी निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये आम्हाला योग्य प्रतिनिधीत्व मिळाल्यास बिनविरोध निवडीला आमचे समर्थन राहील.

शाहूनगर : भोगावती सहकारी साखर कारखान्याची (Bhogavati Sugar Factory) आगामी निवडणूक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) स्वबळावर लढवणार असल्याची माहिती ओमसाई उद्योग समूहाचे संस्थापक व शिवसेना नेते चंद्रकांत पाटील-कौलवकर यांनी परिते येथे पत्रकार परिषदेत दिली.

Uddhav Thackeray:
Satara Police : शिवेंद्रराजेंविरुध्दचा राडा भोवला! खासदार उदयनराजेंसह 45 जणांवर गुन्हा दाखल

यावेळी पाटील म्हणाले, ‘भोगावती कारखान्याची सध्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या श्रमाचे हे मंदिर वाचवण्याची भूमिका घेऊन आम्ही या निवडणुकीत उतरत आहोत. कारखान्याच्या हितासाठी निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये आम्हाला योग्य प्रतिनिधीत्व मिळाल्यास बिनविरोध निवडीला आमचे समर्थन राहील.

Uddhav Thackeray:
Satara : माझ्या जागेत पाय ठेवाल तर तंगडे तोडणार; उदयनराजेंचा थेट शिवेंद्रराजेंना इशारा

मात्र, निवडणूक लागल्यास आम्ही ताकदीने या निवडणुकीत उतरणार आहोत. आजपर्यंत कारखाना वाचवू म्हणणाऱ्या सर्वांनीच गेल्या वीस वर्षांत कारखान्याच्या हिताकडे लक्ष दिलेले नाही. या निवडणुकीत सर्वसामान्य सभासद आमच्याबरोबर असल्याने आम्ही ही निवडणूक निश्चित जिंकू.’ पत्रकार परिषदेस शिवसेना करवीर तालुकाप्रमुख भरत आमते, डॉ. व्ही. बी. सरावणे, सागर पाटील, अविनाश परीट, सखाराम पाटील, संपत फराकटे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.