अपघातातील अज्ञात वाहन शोधण्याचे आव्हान

गुन्ह्यातील संशयित अज्ञात वाहन शोधण्याचे आव्हानही तपास यंत्रणेला पेलावे लागत आहे.
accident
accidentsakal
Updated on
Summary

गुन्ह्यातील संशयित अज्ञात वाहन शोधण्याचे आव्हानही तपास यंत्रणेला पेलावे लागत आहे.

कोल्हापूर : वाहतूक नियम(traffic rules) धाब्यावर बसवत धूम स्टाईलने वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले. तसे जिल्ह्यातील अपघातांच्या(accident) संख्येतही वाढ होऊ लागली. हे अपघात अनेकांच्या जिवावर बेतू लागले. अपघातांच्या गुन्ह्यातील संशयित अज्ञात वाहन शोधण्याचे आव्हानही तपास यंत्रणेला पेलावे लागत आहे.

उत्पन्न वाढीबरोबर लोकांच्या राहणीमाणही उंचावले. तशी जिल्ह्यातील वाहनांची संख्या वाढू लागली. हजारातील वाहने लाखांच्या घरात पोहचली आहेत. पण, त्या तुलनेत शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांची रुंदी वाढलेली नाही. शहर, ग्रामीण भाग असो अगर महामार्ग असो येथे वेगवेगळ्या कारणांनी होणारी वाहतूक कोंडी ही नवी राहिलेली नाही.

बेशिस्त पार्किंगने यामध्ये भर पडू लागली. वाहतूक कोंडीबरोबर जिल्ह्यातील अपघाताच्या संख्येतही वाढ होऊ लागली. कोरोना संकटामुळे मागील दोन वर्षी झालेल्या अपघाताच्या तुलनेत यावर्षी त्याचे प्रमाण वाढले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि धूमस्टाईल ही त्यामगची प्रमुख कारणे पुढे येत आहेत. पालकांना मुलांच्या हाती वाहन देताना चिंता वाटत आहे.

वाहतूक नियमांची काटेकोर अमंलबाजणी व्हावी यासाठी कारवाईदरम्यान केल्या जाणाऱ्या तडजोड दंडाच्या रक्कमेत नुकतीच वाढ केली आहे. यामाध्यमातून तरी चालकांना शिस्त लागावी आणि अपघाताचे धोके कमी व्हावेत हा त्यामागील उद्देश आहे. यापूर्वी शहर परिसरातील अपघातांचा तपास शहर वाहतूक शाखेमार्फत केला जात होता. पण, त्यात बदल करून ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपघात घडला त्याच पोलिस ठाण्यांकडे पूर्वीप्रमाणे तपास दिला आहे. घटनास्थळी सीसीटीव्हीचा आभाव, अपघातातील जखमींकडून योग्य ती माहिती न मिळाल्याने अज्ञात वाहने शोधण्यात तपास यंत्रणेचा कस लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.