नाट्यशास्त्र विभागाचे प्रवेशद्वार ‘म्युरल्स’ने सजले

कोल्हापुरातील कलाकारांचा सन्मान; लॉकडाउन काळात पालटले रुपडे
shivaji university
shivaji universitysakal
Updated on

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील(shivaji university kolhapur) संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग ‘म्युरल’ने(mural) नटला आहे. कलेचे आश्रयदाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज(rajashri shahu maharaj) यांच्यासह कोल्हापुरातील ९ कलाकारांचा त्यात समावेश आहे. लॉकडाउन(college closed lockdown) काळात विद्यापीठाचे दरवाजे बंद राहिल्याने अधिविभागाचे रुपडे पडद्याआड होते. आता, मात्र म्युरल्सने नटलेला अधिविभाग लक्ष वेधून घेत आहे. विद्यापीठातील तळ्याच्या काठी असलेल्या अधिविभागात संगीत व नाट्यशास्त्रविषयक शिक्षण दिले जाते.

कोल्हापूरच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची जपणूक करत कलाकारांना घडवणारा विभाग, अशी त्याची ओळख आहे. अधिविभागाची स्थापना १९८४ ला झाली असून, डॉ. भारती वैशंपायन, डॉ. शुभदा वायंगणकर, डॉ. एन. व्ही. चिटणीस यांनी विभागप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळली. डॉ. अंजली निगवेकर आता विभागप्रमुख म्हणून काम पाहत आहेत.

shivaji university
कन्व्हर्जन किट मुळे होणार विद्युतऊर्जेवरील वाहनामध्ये रूपांतर; पाथर्डीच्या तरुणाचा शोध

हा विभाग सुसज्ज करण्याचे ठरल्यानंतर म्युरलची कल्पना पुढे आली. कोरोनाचा कहर (corona)ओसरल्यावर २०२० ला त्याचे काम सुरू झाले. कलेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या कलाकारांना त्यात स्थान देण्यात आले. कथ्थक नृत्य, लावणी, वासुदेवाच्या विविध हालचाली, काही वाद्ये विभागाच्या इमारतींवर साकारण्यात आली. इमारतीच्या दोन्ही बाजूंच्या चौकोनांमध्ये लोकसंगीत, नाट्य, विविध वाद्ये, चित्रकला(artist) यांची पोस्टर्स करण्याचे काम प्रसिद्ध कलाकार अशोक सुतार यांनी केले.

shivaji university
बोटीचे सारथ्‍य अन्‌ जंगल वाटेतून प्रवास!

कोल्हापुरातील नऊ कलाकार नवग्रह, मध्यभागी कलेची पृथ्वी, एका बाजूला राजर्षी छत्रपती शाहू महाराज म्हणजे कलेचे आश्रयदाते म्हणजेच सूर्य, अशी म्युरलची कल्पना आहे. म्युरलसदृश पोस्टर्समुळे अधिविभाग लक्षवेधी झाला आहे.

- डॉ. विनोद ठाकूर-देसाई, संगीत व नाट्यशास्त्रविषयक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.