बाजारात आवक झाली कमी; कोथिंबीर, पालेभाज्यांचे दर वाढले

सोयाबीनचा दर पंधरवड्यापासून स्थिर
बाजारात आवक झाली कमी; कोथिंबीर, पालेभाज्यांचे दर वाढले
Updated on

गडहिंग्लज : येथील भाजीमंडईत आवक कमी झाल्याने कोथिंबीर आणि पालेभाज्या महागल्या आहेत. बिन्स, ढब्बू, कारलीचे दरही तेजीत आहेत. तुलनेत टोमॅटो, हिरवी मिरची, वांगी यांचे दर कमी आहेत. फळ बाजारात तोतापुरी आंबे, अननसाची आवक वाढली. स्थानिक हापूस, पायरी आंब्याची आवक कायम टिकून आहे. सोयाबीनचा दर पंधरवड्यापासून स्थिर आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कडक लॉकडाउननंतर येथील भाजीमंडईत सर्वच फळभाज्यांची आवक सुरळीत झाली आहे. पालेभाज्यांची आवक जेमतेम आहे. लालभाजी, कांदापात, पालक यांचे शंभर पेंढ्यांचे दर ६०० ते ७०० रुपयांवर पोचले आहेत. कोथिंबिरीचा दर तर तब्बल एक हजार ३०० रुपये शंभर पेंढी असा झाला आहे. परिणामी, पालेभाज्या १०, तर कोंथिबिर २० रुपये पेंढी असा किरकोळ बाजारात दर आहे. टोमॅटो, हिरवी मिरची, वांगी यांची आवक अधिक असल्याने दर उतरल्याचे भाजीपाला खरेदी-विक्री संघाचे महादेव तराळ यांनी सांगितले. दहा किलोचे दर असे ः दोडका ४५०, बिन्स ७००, ढब्बू, कारली ४००, वांगी २५०, काकडी, भेंडी ३००, हिरवी मिरची २००-३०० रुपये.

बाजारात आवक झाली कमी; कोथिंबीर, पालेभाज्यांचे दर वाढले
कोरोनामुळे असा झाला बालकांच्या मानसिकतेत बदल ; जाणून घ्या तज्ञांचे मत

यंदा विक्रमी दराची नोंद करणाऱ्या सोयाबीनचा दर गेल्या पंधरवड्यापासून स्थिर असल्याचे व्यापारी मल्लिकार्जुन बेल्लद यांनी सांगितले. क्विंटलचा सात हजार रुपये असा भाव आहे. फळ बाजारात कोकणातील हाफूस आंब्याची आवक बंद झाली. तौक्ते वादळामुळे गेल्या आठवड्यातच कशीतरी तुरळक आवक राहिली. तुलनेत स्थानिक हापूस, पायरी आंब्याची आवक चांगली आहे. २०० ते ३५० रुपयांपर्यंत डझनाचे दर आहेत. कर्नाटकातून तोतापुरी आंब्याची आवक वाढली असून, नगाला १० ते २०, तर अननस २५ ते ५० रुपये नग असा दर आहे.

भुईमूग, मक्याची आवक जेमतेम

उन्हाळी भुईमुगाचे क्षेत्र दिवसेंदिवस घटू लागल्याने बाजारातही जेमतेम आवक आहे. मात्र, मागणीमुळे दर वाढलाच. क्विंटलचा ४५५० ते ५५०० रुपये असा दर आहे. मक्याची आवक कमीच असून, १५०० ते १६०० रुपये क्विंटल दर आहे.

बाजारात आवक झाली कमी; कोथिंबीर, पालेभाज्यांचे दर वाढले
शरीरातील ऑक्सिजन वाढीसाठी 'ही' फळे आहेत उपयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.