या मंदिरात भाविकांनी दान केलेले पुजेचे चांदीचे साहित्य कपाटात सुरक्षित ठेवले होते, तर रोख रक्कम दानपेटीत होती.
इचलकरंजी : मारुती मंदिरातील (Maruti Temple) दानपेटी चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच वर्धमान चौकातील दिगंबर जैन मंदिरात (Jain Temple) चोरीची घटना घडली आहे. कपाट फोडून दान केलेले एकूण ८ किलो ५० ग्रॅम चांदीचे साहित्य आणि दानपेटीतील रोख ३ हजार रुपये असा एकूण ४ लाख ९६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने पळवला आहे.