या प्रकारापूर्वी आठवडाभर आधी याच तालुक्यातील नाथापा शामराव माने याचे याच युवतीशी लग्न लावून देत असाच सुमारे पावणेदोन लाखांचा हात या त्रिकुटाने मारला होता.
राशिवडे बुद्रुक : विवाहासाठी आपल्या भागात मुली मिळत नाहीत म्हणून जिल्ह्याबाहेर एजंटांकडून स्थळ शोधायचे, लग्न (Fake Marriage) करायचे व मग बाहेरचे लोक फसवून लावून पळून जातात. असे प्रकार आता नवीन नाहीत; तरीही एकदाचे लग्न होऊ दे म्हणून लोक फसतात. असाच सव्वाचार लाखांचा ऐवज घेऊन पळाल्याचा प्रकार बारडवाडी (ता. राधानगरी) येथे घडला होता. त्यात फसवणूक करणाऱ्या तिघांना राधानगरी पोलिसांनी (Radhanagari Police) काल अटक केली.