दुधाच्या किटलीत जिवंत घोरपड घेऊन बसले अन् अलगद वनविभागानं त्यांना..; असं काय घडलं बहिरेवाडीत?

Panhala Forest Officer : बहिरेवाडी येथे जिवंत घोरपड विक्रीसाठी आणणार असल्याची खबऱ्याकडून माहिती मिळाली होती.
Ghorpad Wild Lizard
Ghorpad Wild Lizardesakal
Updated on
Summary

संशयितांवर वनरक्षक राक्षी यांनी गुन्हा नोंद केला. त्यांच्याकडून जिवंत घोरपड जप्‍त केली.

पन्हाळा : तालुक्यातील बहिरेवाडी येथे मोबाईल शॉपीसमोर जिवंत घोरपड (Ghorpad Wild Lizard) विक्रीसाठी घेऊन आलेल्या दिगंबर सिद्राम रोहिने, प्रकाश श्रीपती बत्ते, केदार वसंत भोसले (सर्व रा. बहिरेवाडी) या तिघांना पन्हाळा वनअधिकारी (Panhala Forest Officer) यांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांनी विक्रीसाठी आणलेली जिवंत घोरपडही जप्त केली.

याबाबत वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी, गुरुवारी (ता. ११) रोजी पन्हाळा वनपरिक्षेत्रातील बहिरेवाडी येथे जिवंत घोरपड विक्रीसाठी आणणार असल्याची खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. यावरून परिक्षेत्र वनअधिकाऱ्यांनी पथकासह बहिरेवाडी येथे छापा टाकला.

Ghorpad Wild Lizard
Hotel The Fern : 'हॉटेल फर्न'ला उच्च न्यायालयाचा मोठा दणका; 'इतक्या' लाखांचा ठोठावला दंड, काय आहे प्रकरण?

यावेळी येथील वारणा मोबाईल शॉपीसमोर दिगंबर रोहिने, प्रकाश बत्ते, केदार भोसले हे दुधाच्या किटलीत जिवंत घोरपड घेऊन बसल्याचे दिसले. त्यावरून संशयितांवर वनरक्षक राक्षी यांनी गुन्हा नोंद केला. त्यांच्याकडून जिवंत घोरपड जप्‍त केली.

ही कारवाई कोल्हापूर उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद, उपवनसंरक्षक (अतिरिक्त कार्यभार), अदिती भारद्वाज, सहायक वनसंरक्षक (वनी व कॅम्पा) कमलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळा वनक्षेत्रपाल अनिल मोहिते, वनपाल सागर पटकारे, वनरक्षक अमर माने, संदीप पाटील, बाजीराव देसाई, तसेच वन्यजीव संरक्षक पथक पन्हाळा यांनी केली.

परिसरात कोठेही वन गुन्हा, अवैध शिकार होत असल्यास त्याची माहिती नजीकच्या वनविभागास किंवा टोल फ्री क्रमांक १९२६ वर तत्काळ देऊन सहकार्य करावे.

-अनिल मोहिते, परिक्षेत्र वनअधिकारी पन्हाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.