खाकीचे स्वप्न कधी साकार होणार ? 3 वर्षांपासून भरती रखडली

काळात वयोमर्यादा ओलांडलेल्या तरुणांचे भरतीचे स्वप्न भंगले असून अनेकांनी भरतीचा नाद सोडला आहे
खाकीचे स्वप्न कधी साकार होणार ? 3 वर्षांपासून भरती रखडली
Updated on

कोल्हापूर : पोलिस दलात भरती (police recruitment) होवून देश सेवेचे स्वप्न उराशी बाळगुन असणाऱ्या तरुणांच्या पदरी निराशा कायम आहे. भरती प्रक्रिया गेल्या ३ वर्षांपासून रखडल्यामुळे तरुणांमध्ये निराशेचे वातावरण आहे. ग्रामीण भागातील हजारो तरुण खाकी साठी धावत असतात. भरती होवून भविष्य घडवु पाहणाऱ्याला तरुणांना या कालावधीत चिंतेने ग्रासले आहे. तरी लवकर ही भरती प्रक्रीया सुरु करावी अशी मागणी होत आहे.

राज्यात (maharashtra) दरवर्षी साधारणपणे सहा हजार पदे रिक्त होतात. परंतू गेल्या दोन वर्षात भरतीची घोषणा झाली परंतू प्रक्रिया मात्र थांबली आहे. कोरोनाचे (covid-19) संकट तसेच आरक्षणाचा न सुटलेला प्रश्न या कारणांमुळे ही भरती प्रक्रियेवर लांबली आहे. सैन्य व पोलीस दलात भरतीसाठी नियोजनबद्ध व्यायाम, शारीरिक क्षमता, त्याचबरोबर बौद्धिक मार्गदर्शन यासाठी अनेक ठिकाणी करिअर अकॅडमी स्थापन झाल्या. ग्रामीण शहरी भागातील अनेक तरुण निवासी अकॅडमीत (academy)राहून सराव करतात. अनेक तरुण अकॅडमीद्वारे भरतीत यशस्वी झाले आहेत. परंतु शासनाकडून भरतीचे बिगूल वाचत नसल्याने तरुणांसह प्रशिक्षण देणाऱ्या अकॅडमीचे संचालकही त्रासले आहेत. सरावानंतर डायटसाठी पैसा नसल्याने अनेकांनी सराव थांबवला आहे.

खाकीचे स्वप्न कधी साकार होणार ? 3 वर्षांपासून भरती रखडली
कोल्हापूर - 5 दिवसांसाठी शहरातील निर्बंध शिथिल; सर्व दुकाने सुरु

कोल्हापुर जिल्ह्यातील (kolhapur district) शाहूवाडी, धानगरी, कागल, चंदगड यासारख्या दुर्गम तालुक्यातील हजारो तरुणांचे ध्येय भरती होण्याचे असते, परंतू त्यांच्या स्वप्नाला खिळ बसली आहे. पोलिस (police) तसेच सैन्य भरतीसाठी वयाची अट असल्यामुळे प्रत्येक संधी ही शेवटची संधी असे समजून तयारी करणारे तरुण आता हतबल झालेले दिसत आहेत. या काळात वयोमर्यादा ओलांडलेल्या तरुणांचे भरतीचे स्वप्न भंगले आहे तर अनेकांनी भरतीचा नाद सोडला आहे.

भरती थांबली पण वय वाढणे थांबले नाही.गेल्या अनेक वर्षांचा सराव, स्वप्न निष्फळ ठरत आहे. "भरतीच्या नुसत्या घोषणेमुळे वैफल्य वाढले आहे. आगामी भरतीत शासनाने वयात सुट द्यावी तर आमचे स्वप्न पुर्ण होईल."

- सागर जगताप, तरुण

खाकीचे स्वप्न कधी साकार होणार ? 3 वर्षांपासून भरती रखडली
सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; मदतीसाठी आलेल्यांनीच केला घात

"तीन वर्षात या तरुणांचे खुप नुकसान झाले. अनेक जण बेरोजगार झाले. या कालावधीत ज्या तरुणांनी भरतीसाठी रितसर अर्ज केले आहेत पण त्यांची पुढील प्रक्रीया झाली नाही अशांना शासनाने वयाची सवलत द्यावी."

- लक्ष्मीकांत हांडे, लक्ष करिअर अकॅडमी, खिंडी व्हरवडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.