bhedasgaon bilashi warna river bridge
bhedasgaon bilashi warna river bridgeesakal

Kolhapur Rain alert: वारणा नदीवरील पुल पाणी आल्याने वाहतुकीसाठी बंद, शिराळा-शाहूवाडी तालुक्यांतील नागरिकांसाठी पर्यायी मार्ग

Kolhapur Flood Alert: सायंकाळी पाचच्या दरम्यान पुलाच्या भेडसगावकडील बाजूवर पाणी आल्याने भेडसगाव ग्रामपंचायतीने रस्त्यावर बॅरिकेडस् लावून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला.
Published on

भेडसगाव, ता. २४ : शिराळा व शाहूवाडी तालुक्यांना जोडणाऱ्या बिळाशी-भेडसगाव मार्गांवरील वारणा नदीवरील पुलावर पाणी आल्याने आज सायंकाळी सहा वाजता हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मागील आठवड्यापासून वारणा धरण परिसरासह शाहूवाडी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. वारणा धरणातून आज ८८७४ क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात आल्यामुळे वारणा नदीची पाणीपातळी वाढून नदीकाठच्या शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे.

सायंकाळी पाचच्या दरम्यान पुलाच्या भेडसगावकडील बाजूवर पाणी आल्याने भेडसगाव ग्रामपंचायतीने रस्त्यावर बॅरिकेडस् लावून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. शिराळा-शाहूवाडी तालुक्यांतील नागरिकांना जवळचा व सोयीस्कर मार्ग म्हणून वारणा नदीवरील या पुलाचा उपयोग होत होता; परंतु आज पूल बंद केल्याने कोकरूडमार्गे वाहतूक करावी लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com