गव्यांचा बंदोबस्त करा अन्यथा मारायला परवानगी द्या अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षकांसमोर शेतकऱ्यांनी मांडली आक्रमक भूमिका
01590
...अन्यथा गव्यांना
मारायला परवानगी द्या
शेतकरी आक्रमक; बाजारभोगावला वनाधिकाऱ्यांसोबत बैठक
बाजारभोगाव, ता. २ ः अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ .व्ही क्लेमेंट बेन व जिल्ह्याचे उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांच्यासमोर शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत गव्यांचा बंदोबस्त करा; अन्यथा त्यांना मारायला परवानगी द्या, अशी मागणी लावून धरली.
बाजारभोगाव (ता. पन्हाळा) येथे वनपाल कार्यालयात वनाधिकारी व शेतकऱ्यांची बैठक झाली. वन्यप्राणी व मानव यांच्यातील संघर्ष कसा कमी करता येईल. वनसंवर्धन व त्यातून स्थानिकांना रोजगार व परिसराचा विकास याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. बाजारभोगाव परिसरात गव्यांचे कळप दिवसाढवळ्या ऊस शेतीचे नुकसान करत आहेत. अनेक शेतकऱ्यांचे हकनाक बळी गेले आहेत. गव्यांचा बंदोबस्त करावा. शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा पोर्ले तर्फ बोरगावचे माजी उपसरपंच अमित काटकर यांनी दिला. जंगलाभोवती सौरऊर्जेचे कुंपण घालण्याची मागणी नितीन हिर्डेकर यांनी केली. शेतकऱ्यांच्या मागण्यांना अप्पर मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन यांनी समर्थपणे उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. मानव व वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष कमी करण्याचा वनविभागाचा प्रयत्न असेल. स्थानिक वन समितीच्या माध्यमातून लोकसहभाग वाढवणे, डोंगर क्षेत्रात उपाययोजना राबवण्यासाठी वन विभाग काम करत आहे, असे सांगितले. उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी पन्हाळा परिक्षेत्र वनाधिकारी अनिल मोहिते, वनपाल नाथा पाटील, वनरक्षक वनमजूर माजी उपसरपंच खंडू बने, सतीश पाटील, उत्तम नाईक, पोंबरेचे माजी सरपंच दत्तात्रय पाटील, मानवाडचे माजी सरपंच फुलाजी पाटील, किसरुळचे माजी उपसरपंच अरुण तळेकर, प्रभाकर कामेरकर, शंकर पाटील, चेतन मोहिते उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.