सार्वजनिक मालमत्ता नुकसान मनोवृत्तीला लगाम हवा
02532
चंदगड ः कन्या शाळेच्या खिडकींच्या काचांवर दगड मारून अज्ञातांनी असे विद्रुपीकरण केले आहे.
-------------------------------
सार्वजनिक मालमत्ता नुकसान मनोवृत्तीला लगाम हवा
चंदगडला कन्या शाळेची नासधूस; अनेक वर्षांपासून शाळा प्रशासन सहन करतेय त्रास
सुनील कोंडुसकर ः सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १९ ः येथील कन्या आणि कुमार विद्या मंदिरमध्ये विकृत मनोवृत्तीच्या तरुणांकडून सातत्याने नासधूस केली जात आहे. अनेक वर्षांपासून पिढ्या बदलल्या, मात्र विकृती कायम आहे. तक्रार कोणावर करायची म्हणून शाळा प्रशासन हा त्रास निमूटपणे सहन करीत आहे. नुकतेच कन्या शाळेच्या नूतन इमारतीच्या काचेच्या स्लायडिंग दगड मारून फोडल्या. त्यामुळे झालेले विद्रुपीकरण पाहताना कोणाच्याही मनात संताप उसळतो. या विकृतीला लगाम घालणे गरजेचे आहे.
शहरातील कुमार आणि कन्या विद्या मंदिर या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा. कुमार शाळेने शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा केला आहे तर कन्या शाळाही सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल करीत आहे. कन्या शाळेची जिल्हा परिषदेच्या निधीतून नूतन इमारत बांधली आहे, तर तत्पूर्वीच कुमार शाळेची कैलास चौकातील जुनी इमारत निर्लेखन करून कन्या शाळेनजीकच नवीन इमारत बांधली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही काही तरुण शाळेच्या कालावधीव्यतिरीक्त तेथे प्रवेश करतात. आवारात खेळायचे आणि जाताना छप्परावर, खिडक्यांवर दगड मारायचे. व्हरांड्यात मद्यपान करून तेथेच बाटल्या फोडायच्या असेही प्रकार घडतात. त्याला आवर घालायचा म्हणून लोखंडी प्रवेशद्वार करून त्याला कुलूप लावले; परंतु त्यावर चढून मैदानात येणारे काही महाभाग आहेत. इमारतीच्या पलीकडच्या बाजूने रस्ता असून तेथून शाळेच्या खिडक्यांवर दगड मारून राग काढणारेही आहेत. कन्या शाळेच्या सध्या फोडलेल्या खिडकींच्या काचा पाहता ते स्पष्ट होते. खरेतर ज्या शाळेत सुसंस्काराचे धडे गिरवायचे, आदर, आपुलकीने वागायचे त्याच शाळेवर दगड मारणे चुकीचे आहे. शाळेचे पावित्र्य राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जात, धर्म, पंथ या पलीकडे जाऊन ज्ञान मंदिराचे पावित्र्य जपायला हवे.
-----------
जिल्हा परिषदेच्या अख्त्यारित या शाळा म्हणजे सर्वांसाठी पवित्र ठिकाण आहे. तेथे विकृतीचे दर्शन घडवणाऱ्यांना चाप बसायला हवा. यासाठी शाळा प्रशासनाला पोलिसांत तक्रार देण्याची सूचना केली आहे. पोलिसांनीही सार्वजनिक ठिकाणी अधूनमधून गस्त घालायला हवी.
- सचिन बल्लाळ, जिल्हा परिषद माजी सदस्य, चंदगड
---------------------------------------, CND23A02533
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.