सातवणेत उद्या शेतीविषयक चर्चासत्र

सातवणेत उद्या शेतीविषयक चर्चासत्र

Published on

सातवणेत उद्या
शेतीविषयक चर्चासत्र
चंदगड ः सातवणे (ता. चंदगड) येथे गुरुवारी (ता. ८) शेतीविषयक चर्चासत्राचे आयोजन केले आहे. श्री छत्रपती शाहू शेतीमाल प्रक्रीया संस्था व महाराष्ट्र राज्य पणन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या चर्चासत्रात काजू, मिरची व फळ पिकांबाबत माहिती देण्यात येणार आहे. पिकांचे व्यवस्थापन, विक्री तंत्र, बाजारपेठ तसेच काजू व इतर कृषी उत्पादनावर मॅग्नेट योजनेतून अनुदान याविषयी तज्ज्ञांकडून माहिती देण्यात येणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.