१५० शेतकऱ्यांसाठी आंतरराज्य अभ्यास दौरा

१५० शेतकऱ्यांसाठी आंतरराज्य अभ्यास दौरा

Published on

03572
गारगोटी : शेतकरी अभ्यास दौऱ्याचा प्रारंभ करताना प्रा. अर्जुन आबिटकर. शेजारी नंदकुमार ढेंगे, दत्तात्रय उगले, अशोक फराकटे, कल्याण निकम आदी.
..............
१५० शेतकऱ्यांसाठी आंतरराज्य अभ्यास दौरा

प्रा. अर्जुन आबिटकर : आमदार आबिटकर व कृषी विभागाच्या माध्यमातून नियोजन

सकाळ वृत्तसेवा
गारगोटी, ता. ७ : शेतकऱ्यांना राज्याबाहेरील कृषीविषयक नवीन तंत्रज्ञान, संशोधनाची माहिती मिळावी. शेतकरी सक्षम बनावेत आणि तंत्रज्ञान प्रसारात त्यांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून व कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या माध्यमातून राधानगरी मतदारसंघातील १५० शेतकऱ्यांना राज्याबाहेरील शेतकरी अभ्यास दौरा आयोजित केल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर यांनी दिली.
शेतकरी अभ्यास दौरा वाहनाच्या पूजनप्रसंगी ते बोलत होते. राहुरी कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य दत्तात्रय उगले प्रमुख उपस्थित होते. अभ्यास दौऱ्यात ऊस संशोधन केंद्र कोईमतूर (कर्नाटक), काजू अनुसंधान निदेशालय पत्तूर (कर्नाटक), सेंद्रीय शेती संशोधन केंद्र, म्हैसूर (कर्नाटक), भारतीय फळ पिके संशोधन केंद्र, बंगळूर (कर्नाटक), चहाचे मळे व कारखाना, उटी (तमिळनाडू) आदी ठिकाणांना शेतकरी भेट देतील.
राधानगरी विधानसभा मतदारसंघातील १५० शेतकऱ्यांचा हा पहिलाच दौरा आहे. यापुढे मतदारसंघातील ३५०० शेतकऱ्यांसाठी आंतरराज्य अभ्यास दौरा आयोजित करण्याचा आमदार प्रकाश आबिटकर यांचा मानस असल्याचे प्रा. अर्जुन आबिटकर यांनी सांगितले.
यावेळी गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे, अशोकराव फराकटे, कल्याणराव निकम, बाजीराव चव्हाण, जयवंत चोरगे, किरण पाटील, उपसरपंच सागर शिंदे, सदस्य प्रशांत भोई, भरत शेटके, दीपक देसाई, महेश सुतार, रणधीर शिंदे, राजेंद्र चिले, अजित चौगले, सचिन पिसे, जितेंद्र भोसले आदी उपस्थित होते.
....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.