गोकुळचे ‘अ’ वर्ग सभासदत्व ३६ दूध संस्थांना ः मिणचेकर

गोकुळचे ‘अ’ वर्ग सभासदत्व ३६ दूध संस्थांना ः मिणचेकर

Published on

03837
हातकणंगले : दूध संस्थांना प्रमाणपत्र वाटप करताना डॉ. सुजित मिणचेकर. शेजारी संजय चौगुले, आदी.
--------
गोकुळचे ‘अ’ वर्ग सभासदत्व
३६ दूध संस्थांना : मिणचेकर
सकाळ वृत्तसेवा
हातकणंगले, ता. १० : गोकुळमध्ये हातकणंगले तालुक्यातील अनेक दूध संस्था अनेक वर्षे दूध पुरवठा करीत आहेते परंतु त्यांना गोकुळ संघाचे ‘अ’ वर्ग सभासदत्व प्राप्त झालेले नव्हते. तालुक्यातील ३६ संस्थांना ‘अ’ वर्ग सभासदत्व मंजूर करून दिले आहे, अशी माहिती गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ. सुजित मिणचेकर यांनी दिली. ते जनसंपर्क कार्यालयात आयोजित संस्थांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात बोलत होते.
हातकणंगले तालुक्यातील अनेक संस्था गोकुळ दूध संघाला बरीच वर्षे दूध पुरवठा करूनही ‘अ’ वर्गामध्ये रूपांतर व मतदानापासून वंचित होत्या. अशा ३६ संस्थांना ‘अ’ वर्गामध्ये रूपांतरित करून त्यापैकी ३३ संस्थांना मतदानाचा हक्क मिळाला आहे. त्यांना डॉ. मिणचेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले, जिल्हा परिषद माजी सदस्य महेश चव्हाण व विश्वासराव इंगवले, आदी उपस्‍थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com