Karmaveer Results (कोल्हापूर, सांगली, बेळगांवसाठी)
जयसिंगपूरची ‘कर्मवीर मल्टिस्टेट’
पुन्हा कर्मवीर सहकार पॅनेलकडे
१८ जागांसाठी निवडणूक; सात नव्या चेहऱ्यांना संधी
जयसिंगपूर, ता. २९ : महाराष्ट्र व कर्नाटक राज्य कार्यक्षेत्र असलेली जयसिंगपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या २०२३-२०२८ साठी व्यवस्थापक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सभासदांनी कर्मवीर सहकार पॅनेलला सत्तेचा कौल दिला. मंगळवारी (ता. २९) दि मर्चंट असोसिएशनमध्ये मतमोजणी पूर्ण झाली.
व्यवस्थापक मंडळाच्या एकूण १८ जागांपैकी मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव असलेली १ जागा बिनविरोध झाल्याने १५ सर्वसाधारण जागांसाठी व महिलांसाठी राखीव २ जागांपेक्षा अधिक उमेदवार राहिले. रविवारी (ता.२७) शांततेत मतदान झाले. संस्थेच्या २७ शाखा असून निवडणुकीस पात्र ५४ हजार २१७ सभासदांसाठी १३ गावांमधून ७१ केंद्रांवर मतदानाची व्यवस्था होती.
कर्मवीर सहकार पॅनेलचे १७ उमेदवार उभे होते; तर विरोधात २ अपक्ष उमेदवार उभे होते. २२ हजार ७८५ सभासदांनी मतदान केले होते. कर्मवीर सहकार पॅनेलचे विजयी उमेदवारांमध्ये सात नव्या सहकाऱ्यांना संधी मिळाली. ७० वर्षं पूर्ण झालेल्या संचालकांनी स्वत:हून नवीन कार्यकर्त्यांना संधी देऊन परिवर्तनास सुरुवात केली.
विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते ः सर्वसाधारण गट-आदिनाथ बाबूराव किणींगे, रुकडी (२०,७२७), अनिल गुंडाप्पा गडकरी, रुई (२०,६८९), भरत शंकर गाट, हुपरी (२०,६७१), भूपाल बंडू गिरमल, अ.लाट (२०,६४०), सागर जंबू चौगुले, अकिवाट (२०,५९१), राजेंद्रकुमार धनपाल नांदणे, कोथळी (२०,६६५), अमोल सुरगोंडा पाटील, हेरले (२०,६७७), कुमार धनपाल पाटील, कुरुंदवाड (२०,६८४), भाऊसो आदगोंडा पाटील, आळते (२०,६२२), रमेश जयकुमार पाटील, उदगांव (२०,६४३), रावसाहेब आप्पासाहेब पाटील, दानोळी (२०,६१०), सुकुमार आण्णा पाटील, माणगांव (२०,६१७), आप्पा बापू भगाटे, नांदणी (२०,५५७), अनिल दादासो भोकरे, कुंभोज (२०,६१६), अरविंद दादासो मजलेकर, चिपरी (१९,७६८). महिला राखीव-उर्मिला मनोहर उपाध्ये, दत्तवाड (२१,०४१), उज्वला सुभाष मगदूम, शिरटी (२०७२४). अनुसूचित जातीसाठी राखीव-पंकज सुरेश ऐवाळे, बस्तवाड (बिनविरोध).
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था(दुग्ध) कोल्हापूरचे प्रदीप मालगावे यांनी काम पाहिले. मतमोजणीवेळी पोलिसानी चोख बंदोबस्त ठेवला होता.
....
कोट
शांततेने व उत्स्फूर्त सहभाग दर्शवून सभासदांनी कर्मवीर मल्टीस्टेट संस्थेवर विश्वास दाखवला असून कर्मवीर सहकार पॅनेलच्या उमेदवारांना संस्थेचे काम करण्याची पुन्हा संधी दिली आहे.
- आदिनाथ किनिंगे, माजी अध्यक्ष, कर्मवीर भाऊराव पाटील मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.