कळे -मल्हारपेठ -सांगरुळ मार्गांवरील  सावर्डेतील धोकादायक विजेच्या खांबाकडे महावितरणचे दुर्लक्ष. मोठा अनर्थ होण्यापूर्वी खांब बदलण्याची ग्रामस्थांची मागणी.  ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा.

कळे -मल्हारपेठ -सांगरुळ मार्गांवरील सावर्डेतील धोकादायक विजेच्या खांबाकडे महावितरणचे दुर्लक्ष. मोठा अनर्थ होण्यापूर्वी खांब बदलण्याची ग्रामस्थांची मागणी. ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा.

Published on

03549

सावर्डेत धोकादायक वीज खांब
महावितरणचे दुर्लक्ष; बदलण्याची ग्रामस्थांची मागणी

सकाळ वृत्तसेवा

कळे, ता. ६ : सावर्डे तर्फ असंडोली (ता. पन्हाळा) येथे कळे-मल्हारपेठ-सांगरूळ मार्गावरील मुख्य रस्त्यावर महावितरणचा अतिउच्चदाबाचा सिमेंटचा विद्युत खांब धोकादायक असून एका बाजूला झुकलेला आहे. वीजवाहक तारा घराला लागूनच असल्याने धोका निर्माण झाला आहे. धोकादायक विजेच्या खांबाकडे महावितरणचे दुर्लक्ष होत असून तो खांब बदलण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
याबाबत जोतिराम मोरे यांनी महावितरण कार्यालयाला वारंवार तोंडी तक्रार देऊनही दुर्लक्ष होत आहे. महावितरणची उपशाखा सावर्डेत असूनही कार्यवाही होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. कार्यवाही न झाल्यास महावितरणला लेखी निवेदन देऊन मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. वीज खांबावरून अतिउच्चदाबाच्या (११ केव्ही) वीजवाहक तारा गेल्या आहेत. आजूबाजूला घरे आहेत. कळे -मल्हारपेठ-सांगरूळ मार्ग येथूनच जात असल्याने मुख्य रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे खांब कोसळून जीवित किंवा वित्तहानी होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. महावितरणने धोकादायक वीजखांब त्वरित बदलावा, अशी मागणी होत आहे.

कोट
येत्या सोमवारी ठेकेदार मिळाला तर झुकलेला विजेचा खांब आहे तेथेच सरळ उभा केला जाईल.
-नितीन नलवडे, शाखा अभियंता, सावर्डे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com