शिक्षकांनी आपले ज्ञान अद्ययावत ठेवत आत्मपरीक्षण करुन  सकारात्मक  जीवन जगावे : प्राचार्य डॉ. ए. एम. पाटील यांचे आवाहन

शिक्षकांनी आपले ज्ञान अद्ययावत ठेवत आत्मपरीक्षण करुन सकारात्मक जीवन जगावे : प्राचार्य डॉ. ए. एम. पाटील यांचे आवाहन

Published on

03189
प्रत्येक शिक्षकाने
ज्ञान अद्ययावत करावे

प्राचार्य पाटील ः विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ

कोडोली, ता. २४ : ‘वर्गाध्यापनात दुर्लक्ष करणे म्हणजे शिक्षकांचा भ्रष्टाचार असून त्यापासून शिक्षकांनी दूर राहिले पाहिजे. प्रत्येक शिक्षकाने आत्मपरीक्षण केले पाहिजे. ज्ञान अद्ययावत केले पाहिजे. सखोल अभ्यास करत मन लावून, जीव ओतून काम केले पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास जग आनंदी व समाधानी दिसेल,’’ असे मत इस्लामपूर येथील वसंत कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य डॉ. ए. एम. पाटील यांनी व्यक्त केले.
येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थी, शिक्षकांना परीक्षेच्या व व्यावसायिक शुभेच्छाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील होते. सरस्वतीदेवी आणि माजी आमदार कै. आमदार यशवंत एकनाथ पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. अध्यक्षीय भाषणात बोलताना पाटील म्हणाले, ‘‘कुटुंबात जसे आई-वडिलांचे मुलांशी नाते असते तसेच नाते शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे असावे.’ यावेळी विद्यार्थ्यांनी महाविद्यालास वस्तू स्वरूपात भेट दिल्या. याप्रसंगी महाविद्यालय विकास समितीच्या सदस्या सुमन जोसेफ गायकवाड यांचा विशेष सत्कार झाला. यावेळी एस. डी. रक्ताडे, गुलनास मुजावर, ऐश्वर्या पोतदार, पद्मश्री पाटील, श्रीकांत तडवळे, सुभाष चौगले यांनी मनोगत व्यक्त केले. संजय जाधव यांनी प्रास्तविक केले. माधुरी पाटील आणि पद्मश्री पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सीमा चोपडे यांनी आभार मानले. यावेळी सचिव डॉ. जयंत पाटील, संस्थाध्यक्षा पद्मजा पाटील आणि विश्वस्त विनिता पाटील यांनी विद्यार्थी, शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com