गांजा विक्रीचे कर्नाटक-गोवा कनेक्शन

गांजा विक्रीचे कर्नाटक-गोवा कनेक्शन

Published on

72768

गांजाचे कर्नाटक, गोवा कनेक्शन
आठवड्याला एका विक्रेत्याकडून किलो विक्री; शहरात ८-१० विक्रेते पोलिसांच्या रडारवर
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० : शहरातील गांजाचा पुरवठ्याचे कनेक्शन थेट कर्नाटक आणि गोव्यातून असल्याची माहिती पुढे येत आहे. कर्नाटकातून दानोळी (ता. शिरोळ) मार्गे त्याचा शिरकाव कोल्हापुरात होत असल्याचे समजते. गोव्याला पर्यटनासाठी प्रवासी घेवून जाणाऱ्या काही वाहनांतून सुद्धा तो कोल्हापुरात आणल्याची माहिती पुढे येत आहे. तसेच लक्ष्मीपुरी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यातून आणखी काही धक्कादायक माहिती पुढे येण्याचीही शक्यता आहे.
कोल्हापुरात अनेक वर्षापासून गांजा विक्री छुप्या पद्धतीने होत आहे. यापूर्वीही पोलिसांनी काहींना पकडून त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली आहे. मात्र अलीकडे हे प्रमाण अधिक वाढले आहे. तरुणाईला याची सवय (व्यसन) लागत आहे. गांजा सहज उपलब्ध होत आहे. त्यामुळेच तरुणाई यामध्ये गुरफटत जात आहे. बुधवारी लक्ष्मीपुरी पोलिसांनी केलेल्या कारवाईत कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तोरस्कर चौकात याचे गोदाम (शेड) असल्याचे दिसून आले. तेथील छाप्यातून दानोळीतील पुरवठादार असल्याचे अधिकृत पोलिसांच्या रेकॉर्डवर आले.
शिरोळ तालुक्यातील दानोळीच्या काही किलोमीटरवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भाग आहे. तेथून महाराष्ट्रात विशेष करून कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात सहज गांजाची तस्करी होण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यामुळेच शहरात मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीस उपलब्ध होत आहे. कोल्हापूर जिल्हा हा कर्नाटक आणि गोव्याच्या सीमालगतचा जिल्हा आहे. त्यामुळे येथे दोन्ही राज्यातून दारू, गुटखा, गांजाची तस्करी होत राहते. नुकताच स्थानिक गुन्हे शाखेने महामार्गावर गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक पकडला होता. या सर्व कारवाईत सातत्य नसल्यामुळेच विक्रेत्यांचे फावते आहे. मुळ पुरवठादारांपर्यंतचे रॅकेट कोल्हापूर पोलिसांनी उद्धवस्थ केले, तर खऱ्या अर्थाने ‘दम मारो दम..च्या’ विळख्यातून तरुणाई मुक्त होईल.
------------
चौकट
पर्यटक वाहतुक करणाऱ्यांकडून ही तस्करी
गांजाची गोव्यातून थेट कोल्हापुरात तस्करी आणि विक्री होत असल्याचे सांगण्यात येते. त्याचाही लवकरच पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. गोव्यातील पर्यटक वाहतुक करणाऱ्यांकडून ही तस्करी केली जात असल्याची माहिती पुढे येत आहे. शरातील एका चौकात हा अड्डा असल्याचे सांगण्यात येते.
----------
मागणी वाढली, दर वाढला
आठवड्याला एका विक्रेत्याकडून एक किलो गांजाची विक्री केवळ शहरात होत आहे. अशा पद्धतीचे आठ-दहा विक्रेते पोलिसांच्या अजेंड्यावर आहेत. फेब्रुवारी महिन्यापूर्वी गांजाचा दहा ग्रॅमच्या पुडीचा दर ३०० रुपये होता. मात्र तो अलीकडे चारशे रुपये झाला आहे. मागणी वाढल्यामुळे दर वाढल्याचे लक्ष्मीपुरी पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाल्याचे सांगण्यात आले..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.