म्हैशीच्या दुधात वाढ करा

म्हैशीच्या दुधात वाढ करा

Published on

म्हैशीच्या दुधात वाढ करा
श्रीमती अंजनाताई रेडेकर; आजऱ्यात दुधसंस्था सचिवांची बैठक
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ११ ः आजरा तालुक्यात दुधाचे उत्पादन चांगले होते. भविष्यात दुधाच्या उत्पादनात वाढ होणे गरजेचे आहे. विशेषतः म्हैशीच्या दुधात वाढ करावी, असे आवाहन गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर यांनी केले.
येथील जे. पी. नाईक सभागृहात तालुक्यातील गोकुळच्या दुध उत्पादक संस्थाची बैठक झाली. संचालिका श्रीमती रेडेकर अध्यक्षस्थानी होत्या. त्यांनी दुध संस्थाच्या अडीअडचणी जाणून घेत मार्गदर्शन केले. बैठकीत सचिव संघटनेच्या मदतीने बसवेश्वर दुधसंस्था भादवणवाडीचे शशिकातं दुडाप्पा नावलगी यांना डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी तर महादेव दुध संस्था मेढेवाडीचे विजय गणु दळवी यांच्या पायावरील शस्त्रक्रियेसाठी अनुक्रमे पाच व सात हजार रुपये धनादेशाचे वाटप केले.
श्रीमती रेडेकर म्हणाल्या, ‘तालुक्यात दररोजचे म्हैश दुधाचे संकलन २४ हजार २४३ इतके तर गायीच्या दुधाचे संकलन ८ हजार ८४६ असे ३३ हजार ८८ लिटर आहे. कोल्हापूर जिल्हा दुध संघाचे दररोज २० लाख लिटर संकलनाचे उद्धीष्ट आहे. दुध संकलन वाढवण्यासाठी सचिवांनी लक्ष घालावे. गोकुळच्या सर्वच सेवा सुविधांचा वापर दुध उत्पादकांपर्यंत पोहचवावा. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळातून कर्ज उपलब्ध करून होतकरू तरुणांना या व्यवसायात आणण्यासाठी प्रेरीत करावे. अद्यावत गोठे तयार करावेत. यासाठी लागेल ती मदत गोकुळ करील.’ पशुसंवर्धन विभाग, वैरण विकास विभाग, गुण नियंत्रणसह सर्व विभागावर चर्चा झाली. सर्व विभागाचे अधिकारी, गोकुळचे पर्यवेक्षक यासह सचिव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.