युवकांनी दुधव्यवसायात करिअर करावे; अंजनाताई रेडेकर

युवकांनी दुधव्यवसायात करिअर करावे; अंजनाताई रेडेकर

Published on

16388
कोळींद्रे (ता. आजरा) : येथे दुध उत्पादकांच्या मेळाव्यात ‘गोकुळ’च्या संचालिका अंजनाताई रेडेकर यांनी मार्गदर्शन केले.

युवकांनी दुधव्यवसायात
करिअर करावे : रेडेकर
कोळींद्रे येथे दुध उत्पादकांचा मेळावा
आजरा, ता. १६ : सुशिक्षित बेरोजगार युवकांनी दुध व्यवसायात करिअर करावे, असे आवाहन ‘गोकुळ’च्या संचालिका अंजनाताई रेडेकर यांनी केले. कोळींद्रे (ता. आजरा) येथील रवळनाथ मंदिरात आनंदराव पाटील-चुयेकर म्हैस दुध व गुणवत्ता वाढ कार्यक्रमांतर्गत दुध संस्था प्रतिनिधी व दुध उत्पादकांची बैठक झाली. या वेळी अध्यक्षस्थानावरून रेडेकर बोलत होत्या. दुध संकलन अधिकारी महेश कोले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
रेडेकर म्हणाल्या, ‘‘ग्रामीण भागात सुशिक्षित बेरोजगार युवकांची संख्या मोठी आहे. त्यांनी योग्य नियोजन व कष्टाची तयारी ठेवल्यास दुध व्यवसायात करिअरची संधी आहे. ‘गोकुळ’ने म्हैश दुध वाढीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. गावोगावी जावून उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. शेतकऱ्यांनी नवीन संकरीत जातीची जनावरे खरेदी करावी. ‘गोकुळ’ची बिल वेळेत मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाची खात्री असल्याने गोकुळ घराघरात पोहचले आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास योजनेतून बेरोजगार युवकांनी दुध व्यवसायात उतरावे. त्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल.’’ संकलन अधिकारी प्रकाश पाटील, डॉ. गावडे, एम. एस. पाटील, रमेश बुगडे, लक्ष्मण परीट, रामचंद्र पाटील, दत्तात्रय पाटील, तानाजी बुगडे, मारुती पाटील, किरण पाटील, विनायक पाटील, बाबुराव धुमाळ, विजय केसरकर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.