Kolhapur : शिक्षकांना घडवणारे शिक्षकच उपाशी; महाविद्यालयांचे 158 दिवसांपासून आझाद मैदानावर धरणे
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उच्च शिक्षणमंत्र्यांना निवेदने देऊनही या प्रश्नावर काहीच हालचाली झालेल्या नाहीत.
गडहिंग्लज : शिक्षणशास्त्र (बीएड) महाविद्यालयात शिक्षक घडवले जातात; मात्र अनुदानच मिळत नसल्याने या महाविद्यालयांतील शिक्षक उपाशी असल्याचे चित्र आहे. २००१ पूर्वीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयांना अनुदान मिळावे या मागणीसाठी लढा सुरू आहे. आझाद मैदानावर (मुंबई) १५८ दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे.
महाराष्ट्र शासनाने २००१ पासून विनाअनुदानितचे धोरण स्वीकारले. या धोरणानुसार तत्पूर्वी स्थापन झालेली सर्व महाविद्यालये अनुदानास पात्र असतानाही शिक्षणशास्त्र महाविद्यालयांना शासनामार्फत अद्याप कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळत नाही. त्यामुळे शिक्षकांचे शिक्षक उपाशी असल्याची परिस्थिती आहे.
गतवर्षी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या तपासण्या झाल्या. संचालक कार्यालयाद्वारे अहवाल मंत्रालयात पोचले; परंतु पुढील कार्यवाही रखडलेली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उच्च शिक्षणमंत्र्यांना निवेदने देऊनही या प्रश्नावर काहीच हालचाली झालेल्या नाहीत.
शासनाने लवकरात लवकर अनुदान मंजूर करावे, अशा मागणीचे पत्रक विनाअनुदानित शिक्षणशास्त्र महाविद्यालय प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी असोसिएशनतर्फे प्रसिद्धीस दिले आहे.
दृष्टिक्षेपात राज्यातील आकडे
- शिक्षणशास्त्र महाविद्यालये.... ८९
- प्राचार्य.................................. ४७
- प्राध्यापक............................. ३४२
- ग्रंथपाल................................ ४०
- शिक्षकेतर कर्मचारी.............. ४०६.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.