Sugar Factory Maharashtra
Sugar Factory Maharashtraesakal

Kolhapur : ..तर कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही; राज्य ऊसतोडणी-वाहतूक संघटनेचा थेट इशारा

'कोणत्याही परिस्‍थितीत ओळखपत्र घेतल्याशिवाय राहणार नाही'
Published on

कोल्‍हापूर : राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक कामगारांची नोंदणी करुन त्यांना ओळखपत्र देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र या कामास ग्रामसेवक संघटनेने विरोध केला आहे. त्यांच्या या कृतीचा निषेध करत असून, पुढील हंगामापूर्वी ओळखपत्र न दिल्यास, साखर कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही, असा इशारा ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेने दिला. याबाबतचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यां‍कडे देण्यात आले.

कामगार नोंदणीसाठी जिल्‍हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. मागील तीन वर्षातील उसतोडणी व वाहतूक कामगारांची माहिती साखर कारखान्यांकडून संकलित करण्यात आली आहे. ही माहिती जिल्‍हा परिषदेकडे सादर करण्यात आली आहे. असे असतानाही ग्रामसेवक संघटनेने ओळखपत्र देण्यास विरोध केला आहे.

Sugar Factory Maharashtra
Revolver Gun Licence : तुम्हालाही 'बंदूक' हवीये? मग, परवान्यासाठी 'हे' अडथळे पार करा; कुटुंबाचं संमतीपत्र आवश्यक

त्यांची ही कृती निषेधार्ह असून उपेक्षित कामगारांना त्रास देणारी आहे. कोणत्याही परिस्‍थितीत ओळखपत्र घेतल्याशिवाय राहणार नाही. शासनाने कोणत्याही यंत्रणेमार्फत ओळखपत्र देण्याची व्यवस्‍था करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जोपर्यंत ओळखपत्र मिळत नाही, तोपर्यंत जिल्‍ह्यातील संपूर्ण ऊसतोड बंद ठेवू, असा इशारा संघटनेने दिला आहे.

Sugar Factory Maharashtra
अंतर्वस्त्रात डिव्हाईस-मायक्रोफोन, कॉपीसाठी दहा लाखांची 'डील'; वनविभागाच्या परीक्षेत धक्कादायक प्रकार

हे निवेदन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रा.आबासाहेब चौगले, राज्य सरचिटणीस प्रा.सुभाष जाधव, दिनकर आदमापुरे, पांडूरंग मगदूम, आनंदा डफळे,नामदेव जगताप, रामचंद्र कांबळे, रंगराव राबाडे आदी उपस्‍थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.